हो बुमराहचा पहिला सामना; इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरताच झाला खास विक्रम

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 5 February 2021

भारतातील पदार्पणाच्या सामन्यात बुमराहने डॅनियल लॉरेन्स याला पायचित करत मायदेशातील पहिली कसोटी विकेट घेतली.

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने इंग्‍लंड (England) विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अनोखा विक्रम आपल्या नावे केला. चेन्‍नई कसोटी सामन्यात मैदानात (Chennai Test) उतरताच त्याच्या नावे विक्रमाची नोंद झाली. तुम्हाला कदाचित पटणार नाही पण भारतीय मैदानात बुमराहचा हा पहिला कसोटी सामना आहे. 2018 मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर आतापर्यंतचे 17 कसोटी सामने त्याने परदेशातील मैदानातच खेळले होते. 

भारतातील पदार्पणाच्या सामन्यात बुमराहने डॅनियल लॉरेन्स याला पायचित करत मायदेशातील पहिली कसोटी विकेट घेतली. त्याला खातेही उघडता आले नाही.  देशात पहिला कसोटी सामना खेळण्यापूर्वी परदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूमध्ये तो सर्वात अव्वलस्थामी आहे. बुमराहने भारतात  पहिला सामना खेळण्यापूर्वी 17 कसोटी सामने परदेशात खेळले आहेत. त्याच्यापाठोपाठ या यादीत जवागल श्रीनाथ यांच्या नाव येते. भारताचे माजी जलदगती गोलंदाज श्रीनाथ यांनी परदेशातील 12 कसोटी सामन्यांतर भारतात आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. आरपी सिंग याने परदेशातील 11 कसोटी सामन्यानंतर भारतात पहिला कसोटी सामना खेळला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही कसोटी पदार्पण हे परदेशातील कसोटी मालिकेनेच केले होते. परदेशातील 10 सामन्यानंतर तेंडुलकरने पहिला कसोटी सामना खेळला होता. आशिश नेहरानेही मायदेशात गोलंदाजी करण्यापूर्वी परदेशात 10 सामने खेळले. 

बुमराहने 17 कसोटी सामने कोणत्या संघाविरुद्ध खेळले 

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7, इंग्लंड विरुद्ध 3, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3, न्यूझीलंड विरुद्ध 2 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामने खेळले आहेत. परदेशातील 17 कसोटी सामन्यात बुमराहने 79 विकेट घेतल्या आहेत. 27 धावा खर्च करुन 6 गडी बाद करणे ही त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या