IPL 2021 : विराटचा पठ्ठ्या गंभीरला मानतो रोल मॉडेल!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 April 2021

ऋतूराज गायकवाड कोरोनातून सावरून धमाकेदार खेळ करताना पाहायला मिळाले होते. देवदत्त पदिक्कलकडूनही हीच अशाच धमाकेदार एन्ट्रीची अपेक्षा आहे.

कर्नाटकचा युवा फलंदाज देवदत्त पदिक्कलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करुन आयपीएलसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. पण कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला स्पर्धेतील काही सामन्याला मुकावे लागणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यात आहे. मागील वर्षी युएईमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू ऋतूराज गायकवाड कोरोनातून सावरून धमाकेदार खेळ करताना पाहायला मिळाले होते. देवदत्त पदिक्कलकडूनही हीच अशाच धमाकेदार एन्ट्रीची अपेक्षा आहे. 

नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या क्रिकेटिंग रोल मॉडेलसंदर्भात खुलासा केला होता. तुझा रोल मॉडेल कोण असा प्रश्न जेव्हा त्याला विचारण्यात आला त्यावेळी त्याने भारतीय संघासाठी खेळणारा प्रत्येक जण माझ्यासाठी रोल मॉडेल आहे, असे उत्तर दिले. एका खेळाडूचा उल्लेख करताना त्याने गौतम गंभीर प्रेरणा स्त्रोत असल्याचे सांगितले.  

IPL 2021 : पंतचा ट्रेलर पाहिला; रेकॉर्डचा पिक्चर अभी बाकी है दोस्त!

पदिक्कल म्हणाला, प्रत्येक व्यक्तिमत्वाची एक कहाणी असते. अनेकांकडून आपल्याला प्रेरणा मिळते. टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व करणे सोपे नाही. त्यामुळे भारतीय संघाकडून खेळलेल्या प्रत्येक खेळाडूला रोल मॉडेल मानतो. एका खेळाडूचे नाव घ्यायचे तर गौतम गंभीरला फॉलो करतो. आजही डावखुऱ्या फलंदाजाच्या बॅटिंगचे व्हिडिओ पाहतो, असेही पदिक्कलने सांगितले.

IPL 2021 : गुणवत्तेला न्याय देणार का?  

विजय हजारे ट्रॉफी 2021 मध्ये त्याने 7 सामन्यात 737 धावा कुटल्या होत्या. 147 च्या सरासरीने त्याने धावा केल्या. मागील आयपीएल हंगामातही त्याने लक्षवेधी खेळी केली होती. युएईमध्ये रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने  15 सामन्यात 473 धावा केल्या होत्याय 


​ ​

संबंधित बातम्या