INDvsENG : सेहवागने शेअर केलेला राहुल गांधीचा व्हायरल व्हिडिओ पाहिलात का?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 1 March 2021

भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती घेतल्यानंतर सोशल मीडियावर तुफान फटकेबाजी करताना पाहायला मिळते.

भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना दुसऱ्या दिवशी आटोपला. नरेंद्र मोदी स्टेडियम चौथ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाले असले तरी तिसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीची गोष्ट अजूनही चर्चेत आहे. चौथ्या कसोटी सामन्याच्या निकालापर्यंत खेळपट्टी चर्चेत रहाणार यात काहीच वाद नाही. फिरकीला साथ देणारी ही खेळपट्टी चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात फलंदाजांसाठी अनुकूल ठरेल, असा अंदाजही वर्तवण्यात सुरु आहे. अवघ्या दोन दिवसांत संपलेल्या कसोटीनंतर खेळपट्टीसंदर्भात उसळलेल्या लाटेतील विरेंद्र सेहवागचे ट्विट आजही व्हायरल होत आहे.

Vijay Hazare Trophy 2021 :बिचारा अय्यर 198 धावांवर रन आउट; भावाचं द्विशतक हुकलं!

भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती घेतल्यानंतर सोशल मीडियावर तुफान फटकेबाजी करताना पाहायला मिळते. अहमदाबाद कसोटीच्या निकालानंतर त्याने अनके ट्विट केले आहेत. त्यातील राहुल गांधींच्या एका भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

विरेंद्र सेहवागने राहुल गांधींच्या एका भाषणाचा व्हिडिओ शेअर करत इंग्लंडच्या संघाची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले होते. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी  "गया खत्म.. बाय बाय... टाटा गुडबाय! असे म्हणताना दिसते. या व्हिडिओवर 78. 3 K लोकांनी लव्हली अशी प्रतिक्रिया दिलीय. तर 10 हजारहून अधिक नेटकऱ्यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. अहमदाबादमधील कसोटीत व्हायरल होणाऱ्या ट्विटमधील आघाडीच्या ट्विटमध्ये सेहवागच्या या ट्विटचा सामवेश आहे.   
 


​ ​

संबंधित बातम्या