कोणताही खास प्लॅन न करता कोहली जाळ्यात अडकला (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 7 February 2021

कोहलीची विकेट मिळावी, असे निश्चितच वाटत होते. पण यासाठी काही खास प्लॅन आखला नव्हता.

चेन्नई : पहिल्या दोन दिवशी फलंदाजांनी दलवल्यानंतर तिसऱ्या दिवशी इंग्लिश गोलंदाजाने भारतीय फलंदाजांना नाचवले. इंग्लंडचा ऑफ स्पिनर डॉम बेस याने टीम इंडियाच्या कर्णधारालाही माघारी धाडले. तिसऱ्या दिवशी त्याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. यात विराट कोहलीसह अजिंक्य रहाणे, पुजारा आणि पंत यांचा समावेश होता. विराट कोहलीची विकेट ही कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे, अशी प्रतिक्रिया डॉम बेसनं दिली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर संघ मजबूत स्थितीत आहे, असा विश्वासही फिरकीपटूने व्यक्त केला. त्याचा हा पहिलाच भारत दौरा आहे. 

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बेस भारतीय कर्णधाराची विकेट मिळणं मोठी गोष्ट असल्याचे म्हटले. कोहली हा सर्वोत्तम खेळाडू असून त्याची विकेट घेणं कोणत्याही गोलंदाजासाठी अभिमानाची बाब असते. सध्याच्या घडीला मी 23 वर्षांचा आहे. मला आणखी खूप खेळायचे असून चढ उतार पाहावे लागतील, असेही तो म्हणाला.  कोहलीची विकेट मिळवल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला असून याचा मला फायदा होईल. पुढच्यावेळीही त्याला (विराट कोहली) लवकर बाद करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्याने सांगितले. 

IND vs ENG: टीम इंडियाच्या ड्रेसिंगरुममध्ये फायटिंग; शास्त्रींनी केलं दुर्लक्ष (VIDEO)

कोहलीची विकेट मिळावी, असे निश्चितच वाटत होते. पण यासाठी काही खास प्लॅन आखला नव्हता. चेंडू योग्य पट्ट्यात टाकून यश मिळवले. एक जागा निश्चित करुन चेंडूचा मारा करत राहिला आणि कोहलीनं पोपच्या हातात झेल दिला, असेही तो म्हणाला. इंग्लंडचा ऑफ स्पिनर बेसचा हा 13 वा कसोटी सामना आहे. श्रीलंका दौऱ्यावर त्याने 12 विकेट घेतल्या होत्या. सध्याच्या घडीला सर्वोच्च गोलंदाजी करत असल्याचे वाटते, असेही त्याने सामन्यानंतर सांगितले. चेंडू वळत असून उर्वरित दिवसांमध्ये खेळपट्टी फिरकीला आणखी साथ देईल, त्यामुळे सामना आमच्या बाजूला झुकला आहे, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.


​ ​

संबंधित बातम्या