INDvsENG : विराटनंही केलाय डिप्रेशनचा सामना; एकटेपणाचा अनुभव खूप वाईट होता

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

डिप्रेशनच्या फेजमध्ये असताना त्याच्या खेळावर मोठा परिणाम झाला. आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीतील तो त्याचा सर्वात मोठ बॅड पॅच होता.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने Depression संदर्भात मोठा खुलासा केलाय. 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यात त्याने सर्वात खराब कामगिरी केली होती. या काळात डिप्रेशनचा सामना करत होतो, असे कोहलीने म्हटले आहे. इंग्लंड दौऱ्यातील सुमार कामगिरीदरम्यान एकटेपणाची भावना अनुभवली आहे, असे त्याने सांगितले. इंग्लंडचा माजी कर्णधार मार्क निकोल्ससोबत चर्चा करताना त्याने डिप्रेशनमध्ये गेलो होतो, अशी कबुली दिली आहे. 

डिप्रेशनच्या फेजमध्ये असताना त्याच्या खेळावर मोठा परिणाम झाला. आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीतील तो त्याचा सर्वात मोठ बॅड पॅच होता. मार्कने जेव्हा कोहलीला विचारले की तू कधी डिप्रेशनचा सामना केला आहेस का? यावर कोहलीनं हो असे उत्तर दिले. तो म्हणाला की,   'हो, मी या मानसिक धक्क्यातून गेलो आहे. माझ्याकडून धावा होत नाहीत हे ऐकणे माझ्यासाठी कठीण होते. प्रत्येक फलंदाज या काळातून जावे लागते, असा विचारही करायचो, असेही त्याने सांगितले. 

IPL Auction 2021 : अनसोल्ड राहिल्यावर गर्लफ्रेंडनं केलं ट्रोल; ICCने केली मध्यस्थी

कोहलीसाठी 2014 मध्ये केलेला इंग्लंड दौरा एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा वेगळ नव्हता.  पाच कसोटी सामन्यातील 10 डावात त्याने 13.50 च्या सरासरीनं 1, 8, 25, 0, 39, 28, 0,7, 6 आणि 20 धावा केल्या होत्या. त्यानंतर आस्ट्रेलिया दौऱ्यावर 692 धावा करत त्याने जोरदार कमबॅक केले होते.  

IPL Auction 2021 : अनेक दिग्गजांच्या पदरी निराशा; जाणून घ्या अनसोल्ड खेळाडूंची संपूर्ण यादी
 

विराटला जाणवत होता एकटेपणा 

इंग्लंड दौऱ्याविषयी विराट म्हणाला की, ' काहीवेळाआपल्यासोबत घडत असलेल्या घटना बदलण्यासाठी तुम्ही हतबल ठरता. या परिस्थितीतून मी गेलो. या जगात मी एकटा पडलोय अशी भावना मनात यायची. माझ्या आयुष्यात मला साथ देणारी लोक होती तरीही मला एकटेपणा जाणवायचा, असेही त्याने स्पष्ट केले. माझ्या जवळ कोणी नव्हते असे नाही पण माझ्याबाबती जे घडत होते ते कशामुळे घडतंय हे सांगणारे कोणी जाणकार कोणीच नव्हतं, असा उल्लेखही त्याने केला. 


​ ​

संबंधित बातम्या