INDvsENG : कोहलीच्या या जबऱ्या कॅचनं मॅच फिरली (VIDEO)

टीम सकाळ
Sunday, 28 March 2021

तळाच्या फलंदाजांना थोडक्यात आटपून टीम इंडिया दिमाखदार विजय मिळवणार असे संकेत मिळाले. पण दुसरीकडे सॅम कुरेन याने वेगळीच स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली होती.

पुण्याच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामना जिंकून भारताने वनडे मालिका खिशात घातली. या सामन्यात आठ क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सॅम कुरेनने भारतीय संघाला चांगलेच टेन्शनमध्ये आणल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या धावफलकावर 6 बाद 168 धावा असताना सॅम कुरेन मैदानात आला. यावेळी टीम इंडिया ही मॅच एकहाती जिंकणार असे वाटत होते. मोईन अली- सॅम कुरेन यांनी सातव्या विकेटसाठी 32 धावा केल्या. मोठे फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा मोईन अलीला भुवनेश्वर कुमारने 29 धावांवर बाद केले. तळाच्या फलंदाजांना थोडक्यात आटपून टीम इंडिया दिमाखदार विजय मिळवणार असे संकेत मिळाले. पण दुसरीकडे सॅम कुरेन याने वेगळीच स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली होती.

त्याने आदिल रशिदच्या साथीने 57 धावांची खेळी करुन भारतीय ताफ्यात टेन्शन निर्माण केले. ही जोडी फोडण्यासाठी विराट कोहलीने शार्दुलच्या हाती चेंडू सोपवला. 40 व्या षटकात विराट कोहलीने आदिल रशीदचा अफलातून झेल टिपत इंग्लंडला आठवा धक्का दिला. राशिदची विकेट मॅचचा टर्निंग पॉइंटच होती. कारण या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली होती. आणि तीन विकेट हातात असल्यामुळे इंग्लिश फलंदाजांवर फार टेन्शन नव्हते. कोहलीने अप्रतिम झेल टिपून शार्दुलला विकेट मिळवून देण्यात मदत केली. 

धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटनंतर सातासमुद्रापलिकडे फेमस होतोय पंतचा 'स्कूप शॉट' (VIDEO)

आदिल रशीद परतल्यानंतर सॅम कुरेन याने मार्क वूडसोबत 60 धावांची भागीदारी केली. त्याच्यासोबत खेळताना सॅमवर दबाव जाणवत होता. अनेक चेंडूवर त्याने स्वत:वर स्ट्राईक घेण्यासाठी सिंगल घेतली नाही. जर आदिल रशीद आउट झाला नसता तर चित्र वेगळे दिसले असते. त्यामुळे या आदिल रशीदची विकेट सामन्याला कलाटणी देणाऱ्या वेगवेगळ्या घटकांपैकी एक ठरली.  
 


​ ​

संबंधित बातम्या