INDvsENG : हारी बाजी को जितना हमे आता है; विराट प्रतिक्रिया

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 9 February 2021

जो सामना आम्ही गमावला त्याविषयी आम्ही कोणतीही कारणे सांगणार नाही. मात्र हे निश्चित आहे की पुढील सामन्यात आम्ही प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देऊ.

चेन्नई : इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पाहुण्या इंग्लंडने यजमानांना 227 धावांनी पराभूत करत मालिकेत आघाडी घेतली आहे. सलामीलाच पत्कराव्या लागलेल्या सामन्यासाठी काही कारणे देणार नाही, असे विराट कोहलीनं म्हटले आहे. अपेक्षेप्रमाणे खेळता आले नाही त्यामुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. उर्वरित तीन सामन्यात जोरदार कमबॅक करु, असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय. 

जो सामना आम्ही गमावला त्याविषयी आम्ही कोणतीही कारणे सांगणार नाही. मात्र हे निश्चित आहे की पुढील सामन्यात आम्ही प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देऊ. पिछाडीवरुन आघाडी कशी मिळवायची हे टीमला चांगलेचट माहित आहे, अशा आशयाच्या शब्दांत त्याने जीती बाजी जितना आता है, असा विश्वास व्यक्त केलाय. मालिकेत कमबॅक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, सर्वोत्तम खेळ करुन मालिका गाजवू असे विराट म्हणाला. 

ICC WTC POINT TABLE : टीम इंडियाला मोठा धक्का, इंग्लंड टॉपला

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सलग चौथा पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडमध्ये संघाला दोन पराभव स्वीकारावे लागले होते. ही मालिका भारतीय संघाने गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराटच्या नेतृत्वाखाली संघाचा लाजीरवाणा पराभव झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील मैदान गाजवल्याचे पाहायला मिळाले होते. नियमित कर्णधार इंग्लंड विरुद्धच्या सामन्याने पुन्हा कमबॅक केले. दुसऱ्या डावात त्याने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण इतर कोणाचीही साथ न मिळाल्याने टीम इंडियाला सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 


​ ​

संबंधित बातम्या