INDvsENG : सॅम-जॉनीनं दिला किंग कोहलीला आश्चर्याचा धक्का

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 29 March 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 'मॅन ऑफ द मॅच' आणि 'मॅन ऑफ द सीरिज' च्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय संघाने कसोटी आणि टी-20 मालिकेतील विजयी रुबाब कायम राखत वनडे मालिकाही खिशात घातली. भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या संघाला कसोटीत 3-1, टी-20 मालिकेत 3-2 आणि वनडेत  2-1 असा पराभव पदरी पडला. अखेरच्या वनडे सामन्यात विश्वविजेत्या संघातील आघाडीच्या फलंदाजांनी गुडघे टेकल्यानंतर सॅम कुरेनने शेवटपर्यंत विजयाची आस कायम ठेवली. त्याची एकाकी झुंज अपयशी ठरली. पण त्याला लक्षवेधी खेळीचं बक्षीस मिळाले. निर्णायक सामन्यात 95 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या सॅम कुरेन याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. एवढेच नाही तर मोकळ्या हाती मायदेशी परतणाऱ्या संघातील जॉनी बेयरस्टोला मालिकावीरचा मान मिळाला. 

INDvsENG : कोहलीच्या या जबऱ्या कॅचनं मॅच फिरली (VIDEO)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 'मॅन ऑफ द मॅच' आणि 'मॅन ऑफ द सीरिज' च्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. इंग्लिश फलंदाजांना या पुरस्काराने सन्मानित करणे त्याला पटलेलं नाही. गोलंदाजांच्या जोरावर भारतीय संघाने निर्णायक वनडे सामना जिंकला. शार्दुल ठाकूर 'मॅन ऑफ द मॅच'  ठरेल, अशी अपेक्षा होती, एवढेच नाही तर मालिकेत उत्तम गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वरला मॅन ऑफ द सीरिज मिळायला हवी होती, अशी भावना विराट कोहलीने सामन्यानंतर बोलून दाखवली. या दोघांशिवाय इंग्लिश ताफ्यातील खेळाडूंना पुरस्कार मिळणे आश्चर्याचा धक्का देणारे होते, असेही विराट कोहली म्हणाला. 

धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटनंतर सातासमुद्रापलिकडे फेमस होतोय पंतचा 'स्कूप शॉट' (VIDEO)

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील निर्णायक सामना इंग्लंडच्या हातून निसटतोय असे वाटत असताना सॅम कुरेनने 83 चेंडूत नाबाद 95 धावांची खेळी करत संघाला सामन्यात आणले. त्याची आत्मविश्वासान बहरलेली खेळी कौतुकास्पद अशीच होती. दुसरीकडे वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात नर्व्हस नाईंटीचा शिकार झालेल्या जॉनी बेयरस्टोने दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी करुन इंग्लंडला सामन्यात बरोबरी करुन दिली. त्याने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 73 ची सरासरी आणि 120.33 च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक 219 धावा केल्या होत्या. 

भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना  48.2 षटकात 329 धावा केल्या होत्या. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर अष्टपैलू सॅम कुरेन याने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने शेवटच्या षटकापर्यंत लढा दिला. पण त्यांना निर्धारित 50 षटकात 9 बाद 322 धावांपर्यंतच मजल मारता आली.  
 


​ ​

संबंधित बातम्या