INDvsENG : पंतची विकेट फुकट गमावली; चूक कोणाची व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 16 March 2021

रिषभ पंत आपल्या नेहमीच्या तोऱ्यात खेळत होता. त्याने 20 चेंडूत 25 धावा केल्या. भारतीय डावातील बाराव्या षटकातील सॅम कुरेनच्या पहिल्या चेंडूवर पंतने टोलावलेल्या चेंडूवर दोन धावा मिळाल्या.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केली. पहिल्या दोन सामन्यात विश्रांती देण्यात आलेल्या हिटमॅनच्या भात्यातून रन्स बनल्या नाही. दुसरीकडे ईशान किशन, लोकेश राहुल यांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. मार्क वूडने इंग्लंडला दमदार सुरुवात करुन दिली. 3 बाद 24 अशी धावसंख्या असताना कोहलीने पंतच्या साथीने डावाला आकार देण्यास सुरुवात केली. ही जोडी सेट झाली होती. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर डोकेदुखी निर्माण झाली असताना या दोघांमधील ताळमेळ ढासळला आणि भारतीय संघाने रिषभ पंतच्या रुपात चौथी विकेट गमावली. 

रिषभ पंत आपल्या नेहमीच्या तोऱ्यात खेळत होता. त्याने 20 चेंडूत 25 धावा केल्या. भारतीय डावातील बाराव्या षटकातील सॅम कुरेनच्या पहिल्या चेंडूवर पंतने टोलावलेल्या चेंडूवर दोन धावा मिळाल्या. यावेळी या जोडीने यष्टीरक्षक गडबडल्याचा फायदा उठवत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि रिषभ पंतला विकेट गमवाली लागली. दुसरी धाव पूर्ण केल्यानंतर रिषभ पंत विकेटच्या खूप मागे गेला होता. त्यामुळे तिसरी धाव घेण्याचे अंतर अधिक वाढले. याचा इंग्लंडला फायदा झाला.

INDvsENG: विराटचा 'लाडला' पुन्हा फ्लॉप; चार डावात तिसऱ्यांदा भोपळा!

विराट कोहलीला पंतने नकार दिला असता तर त्याच्यावर  नाहक विकेट फेकण्याची वेळ आली नसती. पंतच्या विकेटची कोहलीने अखेरच्या षटकात भरपाई केली. स्वत: नाबाद परतत त्याने संघाची धावसंख्या 150 + पोहचवली. भारतीय संघ अडचणीत असताना पंतसोबत कोहलीने 41 धावांची उपयुक्त भागीदारी केली. भारताचा डाव सावरण्यासाठी या जोडीने धरलेला तग महत्त्वपूर्ण ठरला. जर ही विकेट गमावली नसती तर धावफलकावर निश्चितच आणखी धावा लागल्याचे पाहायला मिळाले असते. 

INDvsENG : रोहित IN पण; KL राहुलसाठी सूर्या झाला बळीचा बकरा!
 

पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघाने प्रत्येकी एक-एक सामना जिंकून मालिका बरोबरीत आली आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. भारतीय संघात रोहित शर्माचे कमबॅक झाले. पण त्याला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर भारतीय संघाच्या धावांची गती कमी झाली. पण अखेरच्या 10 षटकात केवळ 3 विकेट गमावून टीम इंडियाने 157 धावांपर्यंत मजल मारली.


​ ​

संबंधित बातम्या