INDvsENG : वॉशिंग्टन-बेयरस्ट्रोचा फाइटिंग सीन (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 12 March 2021

15 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर वॉशिंग्टनने टाकलेला चेंडू मलानने सरळ गोलंदाजाच्या दिशेने टोलवला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात पाहुण्यांनी दिमाखदार विजय मिळवला. ज्याप्रमाणे कसोटी मालिकेची सुरुवात पराभवाने झाली तशीच काहीशी अवस्था टीम इंडियाची टी-20 मालिकेतही झाली आहे. भारतीय टीम पुन्हा तोऱ्यात कमबॅक करेल, असा विश्वास कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केलाय.  पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यामुळे गोलंदाजांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले.  या आव्हानात्मक परिस्थितीत युवा अष्टपैलू वॉशिंग्टनने एक विकेट घेतली. 

INDvsENG : सूर्यासाठी रोहित बाहेर बसला; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

बाराव्या षटकात कर्णधाराने  वॉशिंग्टनच्या हाती चेंडू सोपवला. यावेळी त्याने पहिल्याच चेंडूवर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या जेसन रॉयला चकवा देत त्याला पायचित करुन माघारी धाडले. जेसन रॉयने 49 धावांची खेळी केली. जॉनी बेयरस्ट्रो आणि डेविन मलान या जोडीनं 8 विकेट राखून संघाला विजय मिळवून दिला. 15 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर वॉशिंग्टनने टाकलेला चेंडू मलानने सरळ गोलंदाजाच्या दिशेने टोलवला.

पंतचा इश्कवाला रिस्की शॉट; तोही जोफ्राला (VIDEO)

यावेळी हा चेंडू बेयरस्ट्रोच्या हेल्मेटवर आदळल्याचे पाहायला मिळाले. वॉशिंग्टन हा चेंडू झेलमध्ये रुपांतरित करण्यात धडपडताना पाहायला मिळाले. बेयरस्ट्रोने अडथळा निर्माण केल्याची हावभाव देखील वॉशिंग्टनने केली. दुसऱ्या बाजूला बेयरस्ट्रो हातवारे करुन जाणीवपूर्वक काही केलेल नाही, असे सांगताना पाहायला मिळाले. वॉशिंग्टने बेयरस्ट्रोच्या अंगावर जाताना दिसले. अंपायरनी मध्यस्थी करुन दोघांच्यातील वाद संपुष्टात आणला.  

पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. जोफ्रा आर्चर आणि अन्य गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत टीम इंडियाला अवघ्या 124 धावांत रोखले. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर जेसन रॉय आणि बटलर जोडीने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. डेविड मलान आणि बेयरस्ट्रोने संघाला विजयावर शिक्कामोर्तब केला.  

 


​ ​

संबंधित बातम्या