INDvsENG : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील 'माहोल' बदलला (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 13 February 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाची परतफेड करुन मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरली आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या मैदानात सुरु झाला आहे. प्रेक्षकांसह रंगणारा हा लॉकडाऊनंतरचा पहिलाच सामना असून भारतीय संघाला प्रोत्साहित करण्यासाठी आलेल्या क्रिकेट चाहत्यांमध्ये अनोखा उत्साह पाहायला मिळला. बीसीसीआयने चेन्नईतील प्रेक्षकांच्या उपस्थितीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर करत चाहते स्टेडियमवर परतल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

 IPL 2021 Player Auction : 292 खेळाडूंवर लागणार बोली; वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाची परतफेड करुन मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरली आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सुरुवातीलाच भारतीय संघाला धक्क्यावर धक्के बसले. शुभमन गिल, पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यामुळे बऱ्याच दिवसांनी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी स्टेडियमवर आलेल्या चाहत्यांची निराशा निश्चितच झाली असेल. 

पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात फेल ठरलेल्या हिटमॅन रोहित शर्माने हिट असल्याचे दाखवून देत चाहत्यांना थोडा दिलासा दिलाय. रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केले असून तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. लॉकडाऊननंतर प्रेक्षकांच्या उपस्थितीत शतक साजरे करुन तो संघाच्या डावाला कसे सावरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या