IND vs ENG 2nd Test: कमबॅकसाठी टीम इंडियाचा कसून सराव; BCCI ने शेअर केले PHOTOS

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 11 February 2021

पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात फेल ठरलेल्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेनं बॅटिंगचा कसून सराव केला.

पहिल्या पराभवाचा वचपा काढून मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडिया कसून सराव करत आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात 72 धावांची आश्वासक खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीसह दोन्ही डावात फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेनंही नेटमध्ये चांगलाच घाम गाळला.

Image

बीसीसीआयने खेळाडूंच्या प्रॅक्टिसचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कर्णधार विराट कोहली कॅचिंग प्रॅक्टिस करताना दिसते. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा खालावल्याचे दिसले होते. फिल्डिंगवेळच्या चुकाही पराभवाला कारणीभूत ठरल्या. त्यामुळेच टीम इंडियाने क्षेत्ररक्षणावर अधिक भर दिला. 

Image

पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात फेल ठरलेल्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेनं बॅटिंगचा कसून सराव केला.  रोहित शर्मा पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 12 धावांवर बाद झाला होता. जोफ्रा आर्चर आणि जॅक लीचने रोहितला बाद केले होता.

Image

उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनं दोन्ही डावात मिळून 1 धावा केली होती. दुसऱ्या डावात अँड्रसनने त्याला खातेही उघडता आले नाही. मेलबर्न कसोटी सामन्यात रहाणेच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली होती. त्यानंतर त्याच्या भात्यातून धावा निघालेल्या नाहीत. त्याच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते.  Image

चेन्नईच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात अर्धशतकी करणारा शुभमन गिली प्रॅक्टिस दरम्यान लाइट मूडमध्ये दिसला. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोत त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसते. चांगली सुरुवात करुनही शुभमन मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही शुभमन अशाच परिस्थितीतून गेला होता.  
 


​ ​

संबंधित बातम्या