INDvsENG : 'ये चल फुट'; खेळपट्टीवरुन रडणाऱ्या इंग्लिश मॅनला लिटल मास्टरने दिला डोस

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 6 March 2021

भारतीय संघ जेव्हा 36 धावांत ऑल आउट झाला त्यावेळी कपिल देवने काही प्रतिक्रिया दिली. गावसकर काय म्हणाले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजी यापेक्षा खेळपट्टीची चर्चा अधिक झाली, असे मत भारताचे  माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेट सुनील गावसकर यांनी व्यक्त केली आहे. खेळपट्टीच्या मुद्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणाऱ्यांना लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी चांगलाच टोलाही लगावला आहे. खेळपट्टीवरुन चर्चा करण्यापेक्षा ज्यापद्धतीने फलंदाजी आणि गोलंदाजी झाली त्यावर चर्चा व्हायला हवी होती. ज्या चेंडूवर बॅट्समन बोल्ड झाले किंवा पायचितच्या स्वरुपात ज्यांनी विकेट गमावली त्याला आपण खेळपट्टीला जबाबदार कसे धरु शकत नाही.

बाहेरचे खेळाडू जे बोलत आहेत त्यांना खूप महत्त्व देण्याची गरज नाही, असेही गावसकर यांनी म्हटले आहे. ते काय बोलत आहेत याची चर्चा करण्याची  मुळात गरजच नाही. ज्यो रुट आणि कंपनीने खेळपट्टीवरुन कोणताही मुद्दा उपस्थितीत केलेला नाही. त्यामुळे बाहेरून बोलणाऱ्यांना प्रसारमाध्यमांनी डोक्यावर घेण्याची गरज नाही, असे मत गावसकरांनी मांडले.  

INDvsENG : आपल्याच 3 गड्यांनी वॉशिंग्टनला नाइंटीमध्ये नर्व्हस केलं

भारतीय संघ जेव्हा 36 धावांत ऑल आउट झाला त्यावेळी कपिल देवने काही प्रतिक्रिया दिली. गावसकर काय म्हणाले. तेंडुलकरला काय वाटले. यावर तेथील प्रसारमाध्यमांनी फोकस केला का? असा सवाल उपस्थितीत करत खेळपट्टीवरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या परदेशी खेळाडूंकडे दुर्लक्ष करायला हवे, असे ते म्हणाले. जे खेळपट्टीवरुन बोलत आहेत त्यांना आपुण चल फुट म्हणायला हवे, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. इंग्लिश क्रिकेटर मायकल वॉनसह अन्य लोकांना नाव न घेता सुनील गावसकर यांनी 'चल फुट' असे सुनावले आहे. आपण त्यांना महत्त्व दिले नाही तर त्यांना आपोआफ सुबुद्धी येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.  

"हमारे इश्क से देश को प्यार हुआ" : गावसकर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला होता. चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीच्या जोरावर भारतीय संघाने कमबॅक केले. अहमदाबादचा सामना तर भारतीय संघाने दुसऱ्या दिवशीच जिंकला. फिरकीला साथ दिलेल्या खेळपट्टीवरुन जोरदार चर्चा सुरु झाली. अनेक दिग्गजांनी खेळपट्टीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. विराटसह रोहित आणि प्रतिस्पर्धी संघातील कर्णधार ज्यो रुटने फलंदाज अपयशी ठरल्याचे मान्य केले होते. 
 
 


​ ​

संबंधित बातम्या