INDvsENG : वन-डे इन पुणे! सामना दिसला नसेल; पण क्रिकेट प्रेम पुन्हा दिसलं

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 24 March 2021

वनडे सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना एन्ट्री देण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने मालिकेपूर्वीच स्पष्ट केले होते. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानावर खेळवण्यात आला. कसोटी आणि टी-20 मालिकेतील फॉर्म कायम ठेवत टीम इंडियाने वनडे मालिकेत विजय सलामी दिली. या सामन्यात उणीव भासली ती प्रेक्षकांची. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील सर्व सामने प्रेक्षकांशिवाय इनडोअर खेळवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे वनडे सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना एन्ट्री देण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने मालिकेपूर्वीच स्पष्ट केले होते. 

May be an image of one or more people, stadium and outdoors

Photo Credit : Pravin Shrisunder

कठोर निर्बंधामध्ये खेळवण्यात येणाऱ्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी काही चाहत्यांनी टेकडी गाठल्याचे पाहायला मिळाले. यात सचिन तेंडुलकरचा जबऱ्या फॅनचाही समावेश होता. मुळचा बिहारचा असलेला सुधीर कुमार गौतम हा टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी जवळपास प्रत्येक सामन्यासाठी स्टेडियमवर उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळते. पण पुण्याच्या मैदानात त्याला नेहमीप्रमाणे स्टेडियममध्ये जाता आले नाही. मात्र क्रिकेटच्या जबऱ्या चाहत्याने टेकडीवर बसून आपल्या शैलीत सामन्याचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले.  

May be an image of 2 people, people sitting and outdoors

Photo Credit : Pravin Shrisunder

पुणे-मुंबई महामार्गालगत वसलेल्या गहुंजे स्टेडियमच्या बाजूला घोरवडेश्वर टेकडी आहे. या टेकडीवरुन स्टेडियममधील नजारा बऱ्यापैकी दिसतो. अनेक चाहत्यांनी या टेकडीवर जाऊन आपल्यातील क्रिकेट प्रेम दाखवून देले. मुळात क्रिकेटच्या स्टेडियवरुनही मैदानात नेमक काय सुरुय हे कळत नाही. पण स्टेडियवर जाऊन मॅच पाहण्याचा आनंद काही औरच असतो. अगदी टेकडीवरुन सामना पाहणाऱ्यांना काय दिसले असेल याचा विचार केला तर त्याचं क्रिकेट प्रेम दिसले, हे उत्तर नक्की भेटते. 
 


​ ​

संबंधित बातम्या