INDvsENG : वादग्रस्त निर्णयावर सूर्याचा 'परिपक्व' स्ट्रोक

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 19 March 2021

थर्ड अंपायरने मैदानातील पंचांनी दिलेला सॉफ्ट सिग्नल कायम राखत सूर्याला बाद घोषीत केले. या निर्णयावरुन अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यावर खुद्द सुर्यकुमार यादवनेही प्रतिक्रिया दिली आहे.  

इंग्लंड विरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीत मिळालेल्या संधीच सुर्यानं सोनं करुन दाखवलं. त्याच्या 31 चेंडूतील 57 धावांच्या खेळीनं टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंड संघासमोर 186 धावांचे आव्हान ठेवले होते. जर सुर्या वादग्रस्तरित्या बाद झाला नसता तर टीम इंडियाने 200 धावांचा टप्पाही गाठला असता. पण सॅम कुरेनच्या चेंडूवर जवळपास सीमारेषेनजीक टोलवलेल्या फटक्यावर त्याला विकेट गमवावी लागली. डेविड मलानचा हा झेल वादग्रस्त ठरला. थर्ड अंपायरने मैदानातील पंचांनी दिलेला सॉफ्ट सिग्नल कायम राखत सूर्याला बाद घोषीत केले. या निर्णयावरुन अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यावर खुद्द सुर्यकुमार यादवनेही प्रतिक्रिया दिली आहे.  

सामन्यानंतर सुर्यकुमारने वादग्रस्त निर्णयावर भाष्य करताना आपल्यातील परिपक्वतेची झलक दाखवली. विकेट गमावल्यानंतर निराश झालो नाही. वास्तवात काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात. यावर आपण फार काही करु शकत नाही, असे त्याने सांगत त्याने खेळातील परिपक्वतेसह बोल्यातही पटाईत असल्याचे त्याने दाखवून दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या चेंडूचा सामना करताना त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. टी-20 सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारुन खाते उघडणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चरला त्याने लगावलेल्या षटकाराचीही चांगलीच चर्चा रंगली. 

INDvsENG ODI Squad : 'सूर्या'ची किरणं वनडेतही दिसणार; कृष्णालाही मिळाली 'प्रसिद्धी'

जोफ्राला पहिल्याच चेंडूवर लगावलेल्या षटकारासंदर्भात तो म्हणाला की, आयपीएलमध्ये जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीचा चांगला अभ्यास केला. नव्या फलंदाजांना त्याचा टप्पा काय असतो, हे माहित आहे. त्यामुळेच त्याच्या पहिल्याच चेंडूवर आक्रमक स्ट्रोक खेळणं सहज शक्य झालं. भारतीय संघाकडून प्रतिनिधीत्व करताना तिसऱ्या क्रमांकावर खेळणे ही माझ्यासाठी मोठी संधी होती. मी स्वभाविक खेळ करण्यावर भर दिला, असेही तो म्हणाला.

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ईशान किशनसोबत सुर्यकुमार यादवने टी-20 मध्ये पदार्पण केले. मात्र पहिल्या सामन्यात त्याला बॅटिंग करण्याची संधीच मिळाली नाही. विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने सहज विजय नोंदवला होता. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यात सामन्यात सूर्याला संधी मिळाली नव्हती. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय क्रिकेट चाहत्यांना समजण्यापलीकडचा होता. त्यानंतर सुर्यकुमारला चौथ्या आणि महत्त्वपूर्ण सामन्यात संधी मिळाली. एवढेच नाही या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना त्याला बढतीही देण्यात आली. त्याने संधीच सोन करुन दाखवलं. 


​ ​

संबंधित बातम्या