ICC Test Rankings : रोहितची सर्वोत्तम रँकिंगला गवसणी; अश्विनलाही झाला फायदा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 28 February 2021

रोहित शर्मा कसोटी कारकिर्दीत दुसऱ्यांदा टॉप टेनमध्ये पोहचला आहे. यापूर्वी  742 गुणांसह तो अव्वल दहा फलंदाजमध्ये आल्याचे पाहायला मिळाले होते.  

Letest ICC Test Rankings : भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माला नरेंद्र मोदी स्टेडियमवरील अर्धशतकी खेळीचा मोठा फायदा झाला आहे. अहमदाबाद येथील फलंदाजांसाठी मुश्किल ठरलेल्या मैदानात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले होते. रोहित शर्मा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल दहामध्ये पोहचलाय. त्याने आतापर्यंतची सर्वोच्च रॅकिंगवर कब्जा केला आहे.  

रोहित शर्माने पिंक बॉल कसोटीतील पहिल्या डावात 96 चेंडूत 66 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात त्याने षटकाराने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या डावात त्याने नाबाद 25 धावांची खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याने 14 व्या स्थानावरुन आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. कसोटी क्रमवारीतील आतापर्यंत त्याची सर्वोत्तम रॅकिंग आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी कली होती. या खेळीच्या जोरावर त्याने 19 व्या स्थानावरुन 14 स्थानावर झेप घेतली होती. रोहित शर्मा कसोटी कारकिर्दीत दुसऱ्यांदा टॉप टेनमध्ये पोहचला आहे. यापूर्वी तो 742 गुणांसह अव्वल दहा फलंदाजमध्ये आल्याचे पाहायला मिळाले होते.  

धनश्री म्हणतेय; मी स्वर्गात असल्याचा फिल घेतीये!

गोलदांजीमध्ये अश्विवने चार स्थानांनी सुधारणा करत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पॅट कमिन्स आणि नली वॅग्नर यांच्यानंतर आता अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघातील स्टार जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहची एका स्थानांनी घसरण झाली असून तो आठव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर पोहचलाय. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीनंतर अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. 


​ ​

संबंधित बातम्या