INDvs ENG : BCCI नंतर ICC च्या फ्रेममध्ये कॅच झालं रोहित-विराट प्रेम (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 26 February 2021

मैदानात या जोडीमध्ये कमालीचा ताळमेळ दिसत असला तरी दोघांच्यातील संवाद खूप भारी आहे, यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण कायम आहे.

पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत जिती बाजी हमे जितना आता है! ही झलक पुन्हा एकदा दाखवून दिली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दिमाखदार कामगिरी करत असताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील दुराव्याची अनेकदा चर्चा रंगते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीनं रोहित शर्माच्या दुखापतीबद्दल अलबेला आहे, असे वक्तव्य करुन दोघांच्यात जिव्हाळ्याचा संवाद नसल्याचे चित्र पुन्हा एकदा चर्चेत आले होते. 2019 च्या विश्वचषकातील पराभवानंतर दोघांच्या नात्यात दूरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली. या दोघांनी एकत्रितपणे टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचत या सर्व चर्चा फोल ठरवल्या आहेत.

मैदानात या जोडीमध्ये कमालीचा ताळमेळ दिसत असला तरी दोघांच्यातील संवाद खूप भारी आहे, यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण कायम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी बीसीसीआयही खटाटोप करताना पाहायला मिळाले. चेन्नईत रंगलेल्या दुसऱ्या  कसोटीती सामन्यावेळी रोहित शर्माच्या एका अफलातून स्टोकनंतर ड्रेसिंगरुमध्ये बसलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आनंद लुटताना दिसले होते. विशेष म्हणजे बीसीसीआयने विराट कोहलीला रोहितच्या स्टोकनंतर झालेला आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता. एवढेच नाही तर चेन्नई कसोटीतील विजयानंतर बीसीसीआयने एक खास व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये विराट आणि रोहित एकमेकांची गळाभेट घेताना दिसले होते. 

INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!​

अहमदाबादच्या मैदानात दोन्ही संघातील खेळाडूंना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. शतकाशिवाय रंगलेला आणि दोन दिवसांत संपलेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्माच्या भात्यातून 66 धावा केल्या. अवघ्या 34 धावांवर तीन गडी तंबूत परतल्यानंतर रोहित-विराट जोडीनंही पहिल्या डावात अर्धशतकी भागीदारी करुन भारतीय संघाचा डाव सावरला होता. या दोघांनी केलेली 64 धावांची भागीदारी ही ही दोन्ही संघातील सर्वोत्तम भागीदारी ठरली. या जोडीचा एक भन्नाट फोटो आयसीसीने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. बीसीसीआयनंतर आयसीसीच्या फ्रेमध्येही या जोडीतील प्रेम दिसून आले आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी हा क्षण खूप आनंद देणारा असाच आहे.


​ ​

संबंधित बातम्या