INDvsENG : खेळपट्टीची फिरकीला साथ : रोहित (VIDEO)

सुनंदन लेले
Monday, 22 February 2021

आगामी दोन कसोटींवर जागतिक विजेतेपद लढतीचा अंतिम संघ ठरणार आहे. एक गोष्ट विचारपूर्वक करतो ती म्हणजे आम्ही मागचा किंवा पुढचा फार विचार करत नाही, तर वर्तमानात काय करायचे याकडे लक्ष देतो. - रोहित शर्मा

भारतीय उपखंडातील खेळपट्ट्या फिरकीला साथ देतात यात खरे सांगायचे तर काही नवीन नाही. अहमदाबादचीही खेळपट्टी यासारखीच असेल, असे सांगताना रोहित शर्माने खेळपट्टीबाबत चर्चा नको, त्याबाबत तक्रारही गैर आहे असे सांगितले. परदेशात वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तेज गोलंदाजांना तोंड द्यावे लागते. भारतीय संघाने कधीही कोणत्याही खेळपट्टीबद्दल तक्रार केली नाही. खेळपट्टी कशी आहे याऐवजी क्रिकेट कसे खेळले जात आहे हे महत्त्वाचे आहे. खेळपट्टीशी जुळवून घेण्यासाठी कोणी काय बदल केले याची चर्चा आवश्‍यक आहे, असे रोहित म्हणाला. 

IND vs ENG : टी-20 मालिकेसाठी सूर्यासह IPL मधील तीन हिरोंची टीम इंडियात वर्णी

खेळपट्टीबाबत  उगाच काथ्याकूट करायची गरज काय? मी फलंदाज म्हणून खेळपट्टीचा थोडा अंदाज बांधतो. त्यावर खेळताना माझ्याकडे काय पर्याय तयार करणे गरजेचे आहे हे समजून घेतो. मग त्यासाठी तयारी करतो. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर क्रीज सोडून खेळायचे, की स्वीपचा वापर करायचा हे विचारात घेतो. तिसऱ्या कसोटीसाठी असलेली खेळपट्टीही दुसऱ्या कसोटीप्रमाणे फिरकीला साथ देईल. त्यामुळे तयारी तशीच करतो, असेही तो म्हणाला. 

Vijay Hazare Trophy 2021 : महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराजची शतकी चमक

नवीन मैदान फारच सुरेख आहे. सर्व सुविधांनी सज्ज आहे. व्यायामशाळा आणि इनडोअर सराव सुविधाही विचारपूर्वक केल्या आहेत. मैदानाचे वातावरण छान वाटत आहे. प्रेक्षक असल्यामुळे खेळण्यासाठी मजा येईल. हे जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. तिसरी कसोटी प्रकाशझोतात असल्याने वेगळी तयारी करावी लागत आहे. मैदानावर उंच खांबांवर दिवे नाहीच, तर एलईडी लाईटस्‌ छताला आहेत. त्या प्रकाशाचा झेल पकडताना काय फरक पडतो याचा अंदाज सरावादरम्यान येणार आहे असेही तो म्हणाला.
 


​ ​

संबंधित बातम्या