पंतने गडबडीत कॅच सोडला; पण यष्टीमागच्या बडबडीत कमी पडला नाही; व्हिडिओ व्हायरल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 5 February 2021

वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवरही त्याने मनोरंजक वाक्य फेकली. मेरा नाम है वॉशिंग्टन मेरे को जाना है डीसी, असेही म्हटल्याचे स्टम्प कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे.

INDvsENG : ऑस्ट्रेलियातील मालिका विजयात संघासाठी मोलाची कामगिरी करणारा रिषभ पंत गेल्या काही दिवसांपासून विकेटमागील बोलंदाजीने चर्चेत असतो. धोनी जसा गोलंदाजांना यष्टीमागून सूचना करायचा अगदी तशीच काहीशी नक्कल पंतही करताना पाहायला मिळते. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी असेच काहीसे चित्र पुन्हा अनुभवायला मिळाले. 

अश्विन आणि वॉशिंग्टन गोलंदाजी करत असताना पंत वारंवार यष्टीमागून गोलंदाजांना प्रात्साहित करताना दिसला. अश्विन गोलंदाजी करत असताना बर्न फलंदाजी करत होता. यावेळी यष्टीमागून पंतची बडबड स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाली आहे.  'इधर से बढ़िया है, उधर से फंसेगा तो मजा आएगा! असे पंत म्हणत होता. 

IPL 2021 : निवृतीनंतरही धोनीचीच हवा; माही ठरला बिग बजेट 'खिलाडी'

वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवरही त्याने मनोरंजक वाक्य फेकली. मेरा नाम है वॉशिंग्टन मेरे को जाना है डीसी, असेही म्हटल्याचे स्टम्प कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओवर मेजशीर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. 

मजेशीर एक्टिव्हिटीपूर्वी पंत झेल सोडल्यामुळेही ट्रोल झाला. डावाच्या सुरुवातीलाच त्याने बर्न्सचा झेल सोडला. ईशांत शर्माने भारताकडून डावाला सुरुवात केली. दुसऱ्या षटकात बुमराहचा पहिलाच चेंडू बॅटची कड घेऊन येष्टीमागे गेला. यावेळी पंतची चपळता कमी पडली आणि बर्न्सला जीवनदान मिळाले. बर्न्स त्यावेळी 3 धावांवर खेळत होता. तो 33 धावा करुन अश्विनच्या फिरकीत अडकला.


​ ​

संबंधित बातम्या