INDvsENG : जडेजाची जखम अजून भरली नाही; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 21 January 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाला दुखापत झाली होती. पहिल्या डावात स्टार्कचा एक उसळता चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला होता.

England Tour Of India 2021 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत दुखापतीमुळे निर्णायक सामन्याला मुकावे लागलेल्या रविंद्र जडेजाने इंग्लंड विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. 5 फेब्रुवारीपासून इंग्लंडचा संघ 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेने भारत दौऱ्याला सुरुवात करणार आहे. बीसीसीआय निवड समितीने पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली होती. यात रविंद्र जडेजाचाही समावेश होता. मात्र दुखापतीतून तो अद्याप सावरला नसून त्याला कसोटी मालिकेलाही मुकावे लागणार आहे. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाला दुखापत झाली होती. पहिल्या डावात स्टार्कचा एक उसळता चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला होता. त्यामुळे तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले नाही. अंगठ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली असून या दुखापतीतून सावरण्यासाठी रविंद्र जडेजाला आणखी काही वेळ लागणार आहे. 32 वर्षीय अष्टपैल जडेजाला दुखापतीतून सावरण्यासाठी कमीत कमी सहा आठवड्यांचा कालावधी जाणार आहे. तंदुरुस्तीसाठी त्याला बंगळुरुस्थिती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काही काळ निरीक्षणाखालीही रहावे लागेल. 

ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतली टीम इंडिया; खेळाडूंना क्वारंटाईन नियमातून शिथिलता

BCCI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, T 20I आणि ODI मालिकेत जडेजाचा संघात समावेश करण्यासाठी निवड समिती प्रयत्नशील असेल. भारतीय दौऱ्यावर येणारा इंग्लंडचा संघ चार कसोटी, पाच टी-20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. चेन्नईच्या मैदानातून कसोटी सामन्याने भारत-इंग्लंड यांच्यातील टक्कर सुरु होईल. या मालिकेतून कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पांड्याशिवाय ईशांत शर्मा कमबॅक करणार आहेत.  ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार कामगिरी करणाऱ्या  मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनाही संघात स्थान मिळाले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या