INDvsENG : अनफिट गडी खेळणार की रोहितच्या मोहऱ्याला विराटच्या संघात स्थान मिळणार?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 10 March 2021

चाहर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत (India vs England Test Series)  राखीव खेळाडू म्हणून सामील होता.

Rahul Chahar can be Chance Team India : आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करणारा लेग स्पिनर राहुल चाहर (Rahul Chahar) ला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात संधी मिळण्याचे संकेत आहेत. इंग्लंड विरुद्धच्या आगामी  टी20 मालिकेसाठी (India vs England T20i) भारतीय संघ कसून सराव करत आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार, राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) यांच्या फिटनेसबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे राहुल चाहरला संघात संधी मिळू शकते. 

चाहर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत (India vs England Test Series)  राखीव खेळाडू म्हणून सामील होता. त्याने सोमवारी भारतीय संघातील अन्य खेळाडूंसोबत सराव सत्रातही भाग घेतला होता. त्याच्यासह इंग्लंड दौऱ्यात राखीव स्वरुपात असलेल्या केएस भरत, अभिमन्यु इश्वरन, शाहबाज नदीम आणि प्रियांक पांचाल यांना विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीज करण्यात आले होते.  

अश्विन ठरला सर्वोत्तम; सलग दुसऱ्या महिन्यात भारतीय खेळाडूचा दबदबा

21 वर्षीय चाहरने 2020 आयपीएल (IPL 2020) मध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians IPL) लक्षवेधी कामगिरी केली होती. त्याने 2019 मध्ये  वेस्टइंडीज विरुद्धच्या सामन्यातून टी20 मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर राहुल चाहरने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. 

वरुण आणि  तेवतिया मागील महिन्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये फेल झाले होते. दुसऱ्या फिटनेस टेस्टनंतर त्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा होती. या टेस्टसंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तेवतिया टी20 टीमसोबत अहमदाबादमध्ये क्वारंटाईन आहे. त्याने सराव सत्रातही भाग घेतला होता. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राहुल चाहर विराटच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.


​ ​

संबंधित बातम्या