INDvsENG : अशक्य ते शक्य करणारा कृष्णा; 'प्रसिद्ध' तर होणारच

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 23 March 2021

पहिला वनडे सामना खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने रॉय-बेयरस्ट्रो जोडी फोडली. ही विकेट मिळाली नसती तर सामन्याचा निकाल काय असता हे क्रिकेट जाणकाराला अधिक खोलात जाऊन सांगण्याची गरज नाही. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेसाठी तीन नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले. यातील दोघांना पहिल्याच सामन्यात संधी मिळाली. आणि दोघांनीही संधीच सोन केलं. क्रुणाल पांड्यानं फलंदाजीत ट्रेलर दाखवल्यानंतर कृष्णाने पिक्चर अभी बाकी है...डॉयलॉगसह आपल्यावर पडलेली जबाबदारी चोख पार पाडली. 300 + धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने विश्वविजेत्या संघाचा रुबाब दाखवला. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्ट्रोने पहिल्या विकेटसाठी 135 धावांची खेळी करुन भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडल्याचे चित्र निर्माण झाले असताना पहिला वनडे सामना खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने ही जोडी फोडली. ही विकेट मिळाली नसती तर सामन्याचा निकाल काय असता हे क्रिकेट जाणकाराला अधिक खोलात जाऊन सांगण्याची गरज नाही. 

IND vs ENG, 1st ODI: पुण्याच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगोयोग!

सामन्याला कटाणी देण्याची क्षमता असणाऱ्या बेन स्टोक्सचा काटाही त्यानेच काढला. सॅम बिलिंग्सच बिल फाडल्यानंतर टॉम कुरेनची विकेट घेऊन तीन अष्टपैलूंना त्याने स्वस्तात माघारी धाडले. या विकेट्स मिळवून कृष्णाने भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय एक अनोखा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. पदार्पणाच्या वनडे सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट टिपणारा भारताचा तो पहिला गोलंदाज आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमलेली नाही.

INDvsENG गब्बर नवव्यांदा झाला नर्व्हस नाइंटीचा शिकार

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने आयपीएलमध्ये 24 सामने खेळले आहेत. कोलकाता  नाईट रायडर्सकडून तो आयपीएलमध्ये लक्षवेधी कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. मुंबई इंडियन्स विरुद्ध पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या कृष्णाने पंजाब विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. त्याच्या खात्यात आयपीएलमध्ये  18 विकेट जमा आहेत. 30 धावा खर्च करुन 4 विकेट ही त्याची आयपीएल स्पर्धेतील सर्वोच्च कामगिरी आहे. आयपीएलमुळे फायदा झाला पण 10 षटकांचा कोटा पूर्ण करुन आपल्यातील क्षमता सिद्ध करणे हे मोठे आणि वेगळे चॅलेंज असल्याचे प्रसिद्ध कृष्णाने सामन्यानंतर सांगितले. 
 
 


​ ​

संबंधित बातम्या