INDvsENG ODI Squad : 'सूर्या'ची किरणं वनडेतही दिसणार; कृष्णालाही मिळाली 'प्रसिद्धी'

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 19 March 2021

आपल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग मिळालेल्या सुर्यकुमारने मॅच विनिंग खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधले होते. या कामगिरीनंतर त्याला मोठं बक्षीस म्हणून वनडे संघात स्थान देण्यात आले आहे, असेच म्हणावे लागेल.

इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील वनडे पदार्पणासाठी सुर्यकुमार यादवसाठीही दरवाजे खुले करण्यात आले आहेत. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात सुर्यकुमार यादवने दमदार अर्धशतक केले होते. आपल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग मिळालेल्या सुर्यकुमारने मॅच विनिंग खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधले होते. या कामगिरीनंतर त्याला मोठं बक्षीस म्हणून वनडे संघात स्थान देण्यात आले आहे, असेच म्हणावे लागेल.

2018 पासून सुर्यकुमार यादव आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करताना पहायला मिळाले होते. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सुर्यकुमारने 2018 च्या हंगामात 512 धावा कुटल्या होत्या. 2019 मध्ये 424 आणि युएईत रंगलेल्या आयपीएल हंगामात सुर्याने 480 धावा कुटल्या होत्या. या कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात संधी मिळावी, अशी मागणी जोर धरुन करण्यात आली. सोशल मीडियावर यासंदर्भात प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच त्याला संधी मिळेल, अशी चर्चा रंगली मात्र त्याला इंग्लंड भारत दौऱ्यावर येईपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. टी-20 सामन्यात धमाकेदार सुरुवात करत त्याने आता वनडे संघातही स्थान मिळवले असून कामगिरीत सातत्याने राखून संघातील दावेदारी पक्की करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. 

सुर्यकुमार यादवशिवाय आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करुन लक्षवेधणाऱ्या प्रसिद्ध कृष्णालाही संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे विराट कोहलीचा लाडला आणि विश्वासू लोकेश राहुलला वनडेत स्थान मिळालेले नाही. टी-20 मध्ये वारंवार संधी मिळूनही त्याला अपयश आले होते. 

इंग्लंड विरुद्धच्या वनडेसाठी टीम इंडियाचा संघ  

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भवुनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर. 


​ ​

संबंधित बातम्या