ENGvsIND : DRS च्या वादात रोहिचा IPL मधील फोटो का होतोय व्हायरल?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 5 March 2021

रोहित शर्माला एलबीडब्ल्यू आउट दिल्याचा पंचाचा निर्णय  अनेक चाहत्यांना खटकल्याचे दिसते.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्मा 49 धावांवर बाद झाला. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर त्याने विकेट गमावल्यानंतर भारतीय संघ अडचणीत आलाय. धावफलकावर 121 धावा असताना रोहितच्या रुपात टीम इंडियाला 5 वा धक्का बसला. मैदानाताली पंच मेमन यांनी बेन स्टोक्सच्या चेंडूवर रोहितला बाद ठरवल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 

रोहित शर्माला एलबीडब्ल्यू आउट दिल्याचा पंचाचा निर्णय  अनेक चाहत्यांना खटकल्याचे दिसते. इम्पेक्ट आणि विकेट हिंटिंग दोन्ही प्रकारात निर्णय अंपायर कॉलमध्ये झाला. तो रोहितच्या आणि टिम इंडियाच्या विरोधात गेला. त्यामुळे सोशल मीडियावर पंचांना ट्रोल करण्यात सुरुवात झाली.  

NZvsAUS : खराब खेळीनंतर पत्नीला धमकावले; फिंचने स्फोटक फलंदाजीनं दिलं उत्तर (VIDEO)

काही चाहत्यांनी आयपीएलमधील घटनेचा फोटो शेअर केलाय. आयपीएलमधील एका सामन्यात नितिन मेनन यांच्या निर्णयाने संतापलेल्या रोहित शर्माने बॅटने स्टम्प उडवत नाराजी व्यक्त केली होती. हा फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. या गोष्टीचा बदला घेतला का? असा प्रश्न नेटकरी मेनन यांना विचारत आहेत. नितिन मेनन नेहमीच रोहित विरोधात निर्णय देतात, असा दावाही करण्यात येतोय. 

INDvsENG : अर्धशतक हुकले; पण जे विराटला जमलं नाही ते रोहितनं करुन दाखवलं

... तर रोहित नाबाद ठरला असता

DRS च्या मुद्यावरुन अनेकदा चर्चा रंगत असते. रोहित शर्माच्या विकेटवरुन  पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटले आहे. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाने त्याच्या विकेटसाठी रिव्ह्यूव्ह घेतला. दोन अंपायर कॉलमुळे भारताने रिव्ह्यू गमावला नसला तरी पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे त्याला तंबूत परतावे लागले. DRS मध्ये अंपायर कॉलमध्ये मैदानातील पंचांनी दिलेला निर्णय ग्राह्य मानला जातो. रोहितला मेनन यांनी आउट दिले नसते. आणि इंग्लंडने त्याच्या विरोधात रिव्ह्यू घेतला असता तर रोहित अंपायर कॉलनुसार नाबाद ठरला असता. याउलट किस्सा ऋषभ पंतच्या बाबतीत घडला. पंत सरळ-सरळ स्टंम्प समोर आढळला होता. मात्र पंचांनी त्याला नाबाद दिले. इंग्लंडने रिव्ह्यू घेतला. पण अंपायर कॉल असल्यामुळे विकेट असूनही पंत नाबाद राहिला. 


​ ​

संबंधित बातम्या