INDvsENG : कर्णधार कोहली 'विराट' विक्रमाच्या उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 March 2021

कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा रिकी पाँटिंगचा विक्रम मोडण्यासाठी विराटला एका शतकाची गरज आहे, परंतु 2019 नंतर विराटला एकही शतक करता आलेले नाही. 

अहमदाबाद :  गुरुवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात विराट कोहली कर्णधारपदाच्या काही विक्रमांच्या उंबरठ्यावर आहे. हा सामना विराट कोहलीचा कर्णधार म्हणून 60 वा असणार आहे. या वेळी तो महेंद्रसिंग धोनीच्या या विक्रमाशी बरोबरी करेल. कर्णधार म्हणून 12 हजार आंतरराष्ट्रीय धावांपासून विराट 17 धावा दूर आहे. कर्णधार या नात्याने विराटपेक्षा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग (14,440) आणि दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ (14,878) यांनी अधिक धावा केलेल्या आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा रिकी पाँटिंगचा विक्रम मोडण्यासाठी विराटला एका शतकाची गरज आहे, परंतु 2019 नंतर विराटला एकही शतक करता आलेले नाही. 

INDvsENG: मातीच्या ढेकळात बॅटिंग करत इंग्लिश दिग्गजानं केली पिचची भविष्यवाणी

विराटने हा चौथा कसोटी सामना जिंकला तर तो वेस्ट इंडीजच्या क्‍लाईव्ह लॉईड यांच्या 36 कसोटी विजयांशी बरोबरी करेल. तसेच तो सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत संयुक्तपणे चौथा येईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील चेन्नईच्या मैदानात रंगलेला पहिला सामना टीम इंडियाने गमावला होता. मात्र त्यानंतर चेन्नईच्या मैदानातच भारतीय संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगलेला सामना दुसऱ्या दिवशी जिंकत मालिकेत 2-1 अशी आघाडीही घेतली. या सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान भक्कम केले आहे. चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अनिर्णित राकून विराटच्या नेतृत्वाखील क्रिकेटच्या पंढरीत (लॉर्ड्स) न्यूझीलंड विरुद्ध फायनल खेळण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.


​ ​

संबंधित बातम्या