INDvsENG : टीम इंडियाला टोला हाणणाऱ्या वॉनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 10 February 2021

ज्यो रुटच्या नेतृत्वाखालीली इंग्लंडच्या संघाच्या विजयाने माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) चांगलाच उत्साहित झालाय.

भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या संघाने चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिलीय. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडियासमोर इंग्लंडची टीम किरकोळ आहे, असे बोलले गेले. मात्र त्यांनी दमदार कामगिरी करत पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. अनेकांनी इंग्लंडच्या संघाला 4-0 असा पराभव स्विकारावा लागेल, अशी भविष्यवाणी केली होती. मात्र ते सर्व अंदाज फोल ठरले आहेत. 

ज्यो रुटच्या नेतृत्वाखालीली इंग्लंडच्या संघाच्या विजयाने माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) चांगलाच उत्साहित झालाय. पहिल्या कसोटी सामन्यानंतर त्याने ट्विटच्या माध्यमातून टीम इंडियाच्या कामगिरीची खिल्ली उडवली. भारतीय संघाने वॉनची बडबड फारशी मनावर घेतली नसली तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्याने केलेली गोष्ट चांगलीच खटकली आहे. नेटकरी ट्विटच्या माध्यमातून वॉनवर तुटून पडले आहेत.   

ISL 2021 : 22 वय.. 21 मिनिटे.. 3 गोल.. 'काश्मिरी' पंडिताची कमाल! 

चेन्नईच्या मैदानात इंग्लंडच्या कर्णधाराने 100 वा कसोटी सामना खेळला. याचा दाखला देत मायकल वॉनने भारतीय संघावर तोफ डागली होती. 100 व्या कसोटी सामन्यात 200 धावा करण्याचा पराक्रम करणाऱ्या ज्यो रुटला टीम इंडियाकडून काही गिफ्ट मिळाले का? असा प्रश्न वॉन याने उपस्थितीत केला होता. ब्रिस्बेनमध्ये 100 कसोटी सामना खेळणाऱ्या लॅथन लायनला  (Nathan Lyon) टीम इंडियाच्या कर्णधाराने गिफ्ट दिल्याचा दाखलाही वॉनने दिला होता.    

एकच फाईट वातावरण टाईट; पुरुषाला नमवत महिलेनं पटकावलं 1 मिलियनचं बक्षीस (VIDEO)

मायकल वॉनने ट्विटमध्ये लिहिले होते की,  गाबाच्या मैदानात विजय मिळवल्यानंतर नॅथन लायनला कर्णधाराने सही केलेली जर्सी देण्यात आली होती. भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर चेन्नईमध्ये ज्यो रुटला काही गिफ्ट मिळाले का? या प्रश्नाच्या माध्यमातून त्याने टीम इंडियाला टोला लगावला होता. 

एका चाहत्याने इंग्रजांनी देशावर 150 वर्षे राज्य केल्याचे सांगत कोहिनूर परत द्या मग टि शर्ट मिळेल, अशा शब्दांत मायकल वॉगनची फिरकी घेतली आहे.  एका चाहत्याने लिहिलंय की थोडा धीर धर ‘भारत रूटला सही केलेला टी शर्ट देईल. भारतीय संघाला सीरीज तर जिंकू दे, असा टोला त्याने लगावला आहे. भारतीय संघाला धमाकेदार कमबॅक करायला येते त्यामुळे पुढच्या सामन्यासाठी तुम्ही तयारी करा, असा टोमणाही त्याने हाणला आहे. एका चाहत्याने रुटच्या स्वागतासाठी मागवलेल्या केकचा व्हिडिओ शेअर करत मायकल वॉगनची बोलती बंद केली आहे.   


​ ​

संबंधित बातम्या