IND vs ENG: टीम इंडियाची 'माफिया गँग'; कॅप्टनसह अश्विनचा समावेश असणारा फोटो व्हायरल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 1 March 2021

कसोटी मालिकेसंदर्भात अनेक चर्चा रंगत असताना सध्या सोशल मीडियावर भारतीय संघाचा सदस्य असलेल्या मयांक अग्रवालच्या एका फोटो सोशल मीडियावरच चर्चेत आलाय.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. 4 मार्च रोजी रंगणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू कसून सराव करत आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला अखेरचा सामन्यात विजय मिळाला नाही तरी सामना अनिर्णित राखण्याचे चॅलेंज असणार आहे. 

कसोटी मालिकेसंदर्भात अनेक चर्चा रंगत असताना सध्या सोशल मीडियावर भारतीय संघाचा सदस्य असलेल्या मयांक अग्रवालच्या एका फोटो सोशल मीडियावरच चर्चेत आलाय. मयांकने शेअर केलेल्या फोटोमध्ये टीम इंडियाचे खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. या फोटोत कर्णधार विराट कोहलीसह  केएल राहुल आणि अन्य काही सदस्य एकत्र बसल्याचे दिसते. 

Vijay Hazare Trophy 2021 :बिचारा अय्यर 198 धावांवर रन आउट; भावाचं द्विशतक हुकलं!

मयांक अग्रवालने या फोटोला एक खास कॅप्शन दिल आहे. त्याने लिहिलंय की, ही आमची 'द माफिया गँग, आणि रविचंद्रन अश्विन आमचा मेडिएटर।' यामुळेच फोटो चांगला चर्चेत आलाय. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मयांक टीमचा सदस्य असला तरी त्याला एकाही सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील फ्लॉप शोमुळे तो अकरामध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलाय. त्याच्या ऐवजी युवा फलंदाज शुभमन गिलला संधी देण्यात येत असून त्याने संधीच सोन करुन दाखवले आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या