India ODI debut Record : INDvsENG : वादळी अर्धशतकासह क्रुणालचा पराक्रम

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 23 March 2021

क्रुणाल पांड्याने वनडे पदार्पणाच्या सामन्यात 31 चेंडूत 58 धावांची खेळी केली. यात त्याने 7 खणखणीत चौकार आणि 2 उत्तुंग षटकार खेचले.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात मिळालेलल्या संधीचं क्रुणाल पांड्यानं सोनं करुन दाखवलं. सलामीवीर शिखर धवन आणि विराट कोहलीनं भक्कम पाया रचल्यानंतर लोकेश राहुलच्या साथीनं त्याने कळस चढवण्याचं काम केले. लोकेश राहुलसोबत त्याने 51 चेंडूत 102 धावांची भागीदारी करत संघाचा डाव 317 पर्यंत पोहचवला. दोघेही अर्धशतक खेळीनंतर नाबाद परतले. क्रुणाल पांड्याने वनडे पदार्पणाच्या सामन्यात 31 चेंडूत 58 धावांची खेळी केली. यात त्याने 7 खणखणीत चौकार आणि 2 उत्तुंग षटकार खेचले.  वनडे पदार्पणात अर्धशतकी खेळी करणारा क्रुणाल पांड्या हा तिसरा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. 

1997 मध्ये भारतीयन वनडे संघात पदार्पण केलेल्या विकेटकिपर बॅट्समन साबा करीम याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 55 धावांची खेळी केली होती. त्याच्यानंतर अष्टपैलू रविंद्र जडेजाने अशी कमाल करुन दाखवली होती. रविंद्र जडेजाने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबोच्या मैदानात नाबाद 60 धावांची खेळी केली होती. घरच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा क्रुणाल पांड्या पहिलाच भारतीय खेळाडू आहे. पुण्याच्या मैदानात त्याने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. 

INDvsENG गब्बर नवव्यांदा झाला नर्व्हस नाइंटीचा शिकार

क्रुणाल पांड्याने 18 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 24.2 च्या सरासरीने 9 डावात त्याने 121 धावा केल्या आहेत. 26 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. वनडेतील त्याने 58 धावांची खेळी करत आतापर्यंतची सर्वोच्च खेळीची नोंद केली आहे. फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही क्रुणाल पांड्या बंधुराजाप्रमाणेच उपयुक्त खेळाडू आहे. भारतीय संघाने पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक गमावली होती. मात्र 300 + धावा करुन संघाने विश्वविजेत्या इंग्लंडसमोर तगडे आव्हान ठेवले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या