INDvsENG 'वेड्या'चे घर उन्हात; नरेंद्र मोदी स्टेडियमची 'अंदर की बात'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 February 2021

तरीही खेळाडू थोडे नाराज आहेत, कारण वरच्या गॅलरीत चालत जायचे म्हणजे जवळपास 60-70 पायऱ्या चढून जावे लागणार आहे. थोडक्‍यात लांबचा रस्ता आहे.

नव्याने नामकरण झालेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दोन नव्हे, तर चार ड्रेसिंग रूम आहेत, पण खेळाडूंना तिथून सामना बघता येणार नाहीय. सामना बघायला मैदानात बस स्टॉपच्या आकाराची एक जागा तयार केली आहे आणि वर सगळ्यांनी बसून बघायची गॅलरीही आहे. तरीही खेळाडू थोडे नाराज आहेत, कारण वरच्या गॅलरीत चालत जायचे म्हणजे जवळपास 60-70 पायऱ्या चढून जावे लागणार आहे. थोडक्‍यात लांबचा रस्ता आहे.
 

'वेड्या'चे घर उन्हात

नवे स्टेडियम भव्य-दिव्य आहे यात शंका नाही. तरीही मैदानावरचे छत खूपच छोटे असल्याने निम्म्यापेक्षा जास्त प्रेक्षकांना कडक उन्हात बसून सामना बघायचे आव्हान आहे. तिसरा कसोटी सामना निदान दिवस-रात्रीचा आहे, ज्याने उन्हात बसायचा वेळ कमी असेल, पण चौथ्या सामन्याच्या वेळा दिवसाच्या असल्याने प्रेक्षकांना उन्हाचा तडाखा अजून बसणार आहे, पण कोणत्याही प्रेक्षकाने अजून तक्रार केलेली नाही, कारण त्यांच्या क्रिकेटप्रेमापुढे ही गैरसोय काहीच नाही. म्हणूनच वेड्याचे घर उन्हात असे म्हटले जाते.

INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!​
 

नमस्ते

सामना सुरू होण्याअगोदर राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही संघांना मैदानावर येऊन भेटले. कोव्हिड महामारीमुळे भेटताना चांगले अंतर ठेवले गेले. विराट कोहली आणि ज्यो रुट यांनी आपापल्या खेळाडूंची ओळख राष्ट्रपतींना करून दिली तेव्हा गृहमंत्री अमित शहा सोबत होते. लांबून भेट होत असल्याने भारतीय खेळाडूंनी राष्ट्रपतींना हात जोडून नमस्कार केला. त्याचेच अनुकरण इंग्लंडच्या खेळाडूंनी केले. दोन हात जोडून नमस्कार करताना पाहुण्या संघाच्या खेळाडूंना बघून मजा वाटत होती.
 


​ ​

संबंधित बातम्या