INDvsENG : रोहितसोबत KL राहुल ओपनिंग करेल; पाहा मॅचपूर्वीचा 'विराट' स्ट्रोक

सुनंदन लेले, सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 March 2021

 रोहित शर्मा बरोबर के एल राहुल सलामीला येईल आणि शिखर धवन पर्यायी सलामीचा फलंदाज असेल हे सुद्धा विराट कोहलीने स्पष्ट केले.  
 

अहमदाबाद :  ट्‌वेन्टी-20 क्रिकेट सामना खेळताना कर्णधाराला अधिक सतर्क राहावे लागते. या प्रकाराचा वेग भयानक आहे, ज्यात विचार करायला जास्त वेळ मिळत नाही. निर्णय वेगाने घ्यावे लागतात. त्यामुळे संपूर्ण 11 खेळाडूंमध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता असणे गरजेचे असते, असे मत विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्‌वेन्टी-20 सामन्याअगोदर व्यक्त केले.

INDvsENG 1st T20 : रिषभ पंतची निवड होणार? संघ निवडताना तारेवरची कसरत 

रोहित शर्मा बरोबर के एल राहुल सलामीला येईल आणि शिखर धवन पर्यायी सलामीचा फलंदाज असेल हे सुद्धा विराट कोहलीने स्पष्ट केले. काही महिन्यांवर टी 20 वर्ल्ड कप आला असल्याने सध्या निवडला गेलेल्या संघात रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमरा परत येतील, बाकी खेळाडू जवळपास हेच राहतील, असे सुद्धा विराटने सांगितले. दरम्यान, वरुण चक्रवर्ती तंदुरुस्ती चाचणीत नापास झाल्याने संघातून बाहेर गेल्याचे समजले. भारतीय संघ तंदुरुस्तीबाबत कोणतीही तडजोड करत नाही. वरुणला वेळ होता क्षमता वाढवायला, ते न जमल्याने त्याला बाहेर जावे लागले, असे विराट म्हणाला. 


​ ​

संबंधित बातम्या