कोपऱ्याच्या दुखापतीमुळे आर्चर टी-20 मालिकेस मुकणार?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 March 2021

2020 च्या सुरुवातीस केपटाऊन कसोटीच्या वेळी आर्चरला या दुखापतीचा पहिल्यांदा त्रास झाला. 

अहमदाबाद : कोपऱ्याच्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटी सामन्यास मुकणारा इंग्लंडचा हुकमी वेगवान गोलंदाज येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 मालिकेतही न खेळण्याची शक्‍यता आहे. या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागली तर आयपीएलवरही पाणी सोडवे लागेल असे चित्र आहे.

कोपऱ्याच्या दुखापतीने आर्चरला सतावलेले आहे 2020 च्या सुरुवातीस केपटाऊन कसोटीच्या वेळी आर्चरला या दुखापतीचा पहिल्यांदा त्रास झाला. त्यानंतर हे ‘स्ट्रेस फॅक्‍चर’ असल्याचे निदान झाले. भारत दौऱ्याअगोदर झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही तो खेळू शकला नव्हता.

टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचं स्वप्न तुटण्याची भिती

आर्चरच्या कोपरावर सध्या तरी शस्त्रक्रियेची गरज नाही, परंतु दीर्घकालीन विचार करता आम्ही संघाच्या वैद्यकीय टीमशी चर्चा करत आहोत, भारताविरुद्धच्या ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी आम्ही नंतर निर्णय घेऊ, असे इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी सांगितले.आर्चरने तंदुरुस्ती तपासण्यासाठी आज संघाबरोबर सराव केला, अशी माहिती सिल्व्हरवूड यांनी दिली.
 


​ ​

संबंधित बातम्या