रुट ना जाना! षटकारानं साजरं केलं द्विशतक

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 6 February 2021

100 व्या कसोटीत द्विशतक झळकवण्याचा विक्रमही आता त्याच्या नावे झाला आहे. 

इंग्लंचा कर्णधार ज्यो रुट श्रीलंकेत दिसलेल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे. अश्विनच्या गोलंदाजीवर षटकार खेचत त्याने कसोटी कारकिर्दीतील पाचवे द्विशतक पूर्ण केले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कोसोटी सामन्यातही त्याने द्विशतकी खेळी केली होती. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली त्यावेळी ज्यो रुट 128 धावांवर खेळत होता.

IND vs ENG: ज्यो-विराट सीनने धोनीच्या आठवणीला उजाळा (VIDEO)

बेन स्टोक्ससोबत मजबूत भागीदारी रचत त्याने संघाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले आहे. शंभराव्या कसोटी सामन्यातील डबल टोन त्याच्यासाठी अविस्मरणीय अशीच असेल. भारतात येण्याअगोदर गेल्या महिन्यातील श्रीलंका दौऱ्यात रूटने द्विशतक आणि दीड शतक केले होते. आता 98, 99 आणि 100 व्या कसोटी अशा सलग तीन कसोटीत शतक करणारा तो क्रिकेटविश्‍वातील पहिला फलंदाज ठरला. त्यात आता आणखी भर पडली असून 100 व्या कसोटीत द्विशतक झळकवण्याचा विक्रमही आता त्याच्या नावे झाला आहे. 

रूटची भारतातील पाळेमुळे; चेन्नईच्या मैदानात खास विक्रमाला गवसणी

मागील दोन वर्षांत त्याच्या भात्यातून धावा निघत नव्हत्या, 2019 मध्ये रुटने 12 कसोटी सामने खेळले यात त्याने 37 च्या सरासरीनं 851 धावा केल्या. 2020 मध्ये 8 कसोटी सामन्यात त्याने 42 च्या सरासरीनं 464 धावा केल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात त्याने आपल्यातील क्षमता पुन्हा दाखवून दिली. पहिल्या कसोटी सामन्यातील द्विशतक आणि दुसऱ्या कसोटी सामन्याती दीड शतकी खेळीनं इंग्लंडने श्रीलंकेत मालिका विजय मिळवला होता. 


​ ​

संबंधित बातम्या