INDvsENG : अश्विननं पाहुण्या इंग्लंडची जिरवली; मैदानाबाहेर भज्जीनं घेतली ईशाची फिरकी

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 14 February 2021

अश्विनच्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंड संघाला पहिल्या डावात 134 धावांत आटोपले.

चेन्नईच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अश्विननं इंग्लंडच्या संघाचा रुबाब उतरवला. चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात इंग्लिश गोलंदाजांनी अश्विनच्या गोलंदाजीवर गुडघे टेकले. अश्विनच्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंड संघाला पहिल्या डावात 134 धावांत आटोपले. इंग्लंडच्या पहिल्या डावातील खेळ खल्लास झाल्यावर मैदानाबाहेर हरभजनने पाहुण्या संघावर विश्वास दाखवणारी इंग्लंड महिला संघाची माजी क्रिकेटर आणि सध्याची समालोचक ईशा गुवाहीची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले. ईशा गुहा हिने भारतीय स्पिनिग ट्रॅकवर इंग्लंडचा संघ 200 + धावा करेल, असा अंदाज वर्तवला होता.

Ind vs En 2nd Test : अश्विनचा पंजा; 134 धावांतच इंग्लंडचा खेळ खल्लास!

चेन्नईच्या मैदानात फिरकीला मिळणारी मदत पाहून इंग्लंडच्या संघाला मोठी धावसंख्या उभारणे कठिण असल्याचा सूर उमटत होता. दरम्यान ईशा गुहाने ट्विटच्या माध्यमातून या परिस्थितीत इंग्लंडचा संघ 200 धावा करेल, असा विश्वास तिने व्यक्त केला. यावर हरभजन सिंगने तिला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही डावात मिळून इंग्लंडला दोनशेचा टप्पा गाठता येईल, अशा शब्दांत अश्विनने ईशाची फिरकी घेतली. 

INDvsENG : वाजवा रे, शिट्या, टाळ्या वाजवा; विराटचा मैदानावरूनच प्रेक्षकांशी संवाद! (VIDEO)

सोशल मीडियावर महिला आणि पुरुष क्रिकेटर यांच्यात रंगलेल्या जुगलबंदीचा क्रिकेट चाहत्यांनी चांगलीच मजा घेतली. भज्जीची प्रतिक्रिया लोकांना चांगलीच पसंत पडली. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असून भज्जीने ईशाला उद्देशून लिहेलेली भज्जीच्या प्रतिक्रियेचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांनी इंग्लंडच्या संघाला 150 ते 160 धावा करता येतील, अशी भविष्यवाणी केली होती. मात्र संघातील खेळाडूंना इथपर्यंतपण मजल मारता आली नाही.

134 धावांतच त्यांचा पहिला डाव आटोपला. भारताकडून अश्विनने सर्वाधिक 5 बळी टिपले. त्याला अक्षर पटेल आणि ईशांत शर्माने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेत उत्तम साथ दिली. मोहम्मद सिराजनेही एका गडयाला तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाचा डाव आटोपून भारतीय संघाने पुन्हा बॅटिंग करण्यास सुरुवात केली असून सध्याच्या घडीला 249 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या संघाला चौथ्या डावात आव्हान परतवणे सहज आणि सोपे नाही.    


​ ​

संबंधित बातम्या