IND vs ENG : टी-20 मालिकेसाठी सूर्यासह IPL मधील तीन हिरोंची टीम इंडियात वर्णी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 20 February 2021

युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर सूर्यकुमारला टीम इंडियात स्थान मिळावे अशी चर्चा रंगली होती.

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाटी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.  बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातूनही टी-20 संघात सामील करण्यात आलेल्या गड्यांची नावे शेअर केली आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली युएईतील आयपीएलमध्ये लक्षवेधी खेळी करणाऱ्या तिघांना स्थान देण्यात आले आहे. 19 सदस्यीय ताफ्यात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळललेल्या सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि राजस्थान रॉयल्सकडून धमाकेदार कामगिरी केलेल्या राहुल तेवतिया या नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. 

युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर सूर्यकुमारला टीम इंडियात स्थान मिळावे अशी चर्चा रंगली होती. त्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बॅटिंग केली होती. आयपीएलमधील त्याच्या खेळीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला संधी द्यावी, अशी नेटकऱ्यांनी मागणी केल्याचे पाहायला मिळाले. पण त्याला संघात स्थान मिळाले नाही. भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाविरुद्द नेटकऱ्यांची आणि सूर्यकुमारची ईच्छा पूर्ण होणार आहे. संघात स्थान मिळाल्यानंतर तो मैदानात प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

इंग्लंड विरुद्धच्या टी-20मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा, (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्थी , अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप, शार्दुल ठाकूर. 


​ ​

संबंधित बातम्या