INDvsENG: भज्जीचा दुसरा; 'सुंदर' ऑल राउंडरचा शोध संपेल; पण..

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 6 March 2021

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आठव्या क्रमांकावर फंलदाजीला आला. संकटात असलेल्या टीम इंडियाचा डाव सावरण्यात त्याने महत्त्वपूर्ण खेळी केली.

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने दमदार बॅटिंगचा नजराणा पुन्हा एकदा दाखवून दिला. ऑस्ट्रेलियातील धमाक्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात केलेली कामगिरीचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे. स्टार स्पोर्ट्सच्या एक्स्ट्रा टाईममध्ये भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही वॉशिंग्टन सुंदरच्या कामगिरीचे कौतुक केले. वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळवले असले तरी तो एक सर्वोत्तम आणि वरच्या क्रमांकावर फंलदाजीसाठी सक्षम असणारा खेळाडू असल्याचे भज्जी म्हणाला.

वॉशिंग्टनच्या रुपात टीम इंडियाला बऱ्याच काळापासून हव्या असलेल्या उत्तम अष्टपैलूचा शोध संपेल, असे वाटते. पण वॉशिंग्टनने गोलंदाजीमध्ये आणखी मेहन घ्यायला हवी, असा सल्लाही हरभजन सिंगने दिलाय. अश्विनकडून त्याने गोलंदाजीचे धडे घेऊन गोलंदाजीचा दर्जा सुधारला तर तो तीन प्रकारात भारतासाठी उपयुक्त अष्टपैलू म्हणून नावारुपाला येऊ शकतो, असे मत हरभजन सिंगने मांडले आहे. 

INDvsENG : आपल्याच 3 गड्यांनी वॉशिंग्टनला नाइंटीमध्ये नर्व्हस केलं

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आठव्या क्रमांकावर फंलदाजीला आला. संकटात असलेल्या टीम इंडियाचा डाव सावरण्यात त्याने महत्त्वपूर्ण खेळी केली. दुसऱ्या दिवशी पंतसोबत शतकी भागीदारी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याने अक्षर पटेलसोबत दीडशतकी भागीदारी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या डावानंतर 160 धावांची आघाडी मिळाली. 

"हमारे इश्क से देश को प्यार हुआ" : गावसकर
 

21 वर्षीय वॉशिंग्टन याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या चेन्नई कसोटीत 85 धावांची नाबाद खेळी केली होती. अखेरच्या सामन्यात तो शतक करेल, असे वाटत असताना दुसऱ्या बाजूने भारतीय संघाचा डाव आटोपल्याने पहिल्या कसोटी शतकाची त्याची प्रतिक्षा आणखी वाढली. चार कसोटी सामन्यातील 6 डावात वॉशिंग्टन सुंदरने 66.25 च्या सरासरीने 265 धावा केल्या आहेत. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंड विरुद्धची नाबाद 96 धावांची खेळी ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च खेळी आहे.  गोलंदाजीमध्ये त्याने एवढ्याच सामन्यातील 6 डावात 283 धावा खर्च करुन 6 विकेट घेतल्या आहेत. यात 3/89 ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.


​ ​

संबंधित बातम्या