INDvsENG ...म्हणून इंग्लंड कसोटीसाठी हार्दिक पांड्याची निवड योग्य ठरते

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 3 February 2021

टीम इंडियाकडे अश्विन, जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्यारुपात अष्टपैलू खेळाडूंचे पर्याय उपलब्ध असले तरी परदेशात पांड्याची गरज भासू शकते, असे मत दासगुप्ता यांनी व्यक्त केले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह, ईशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या या कसोटी मालिकेतून कमबॅक करणार आहेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी  हार्दिक पांड्याची निवड हा थोडा चर्चेचा विषय आहे. भारतीय संघाचे माजी विकेट किपर दीप दासगुप्ता  (Deep Dasgupta) यांनी इंग्लंड विरुद्ध हार्दिक पांड्याची निवड करण्यामागचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. 

ते म्हणाले की, सध्याच्या घडीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये फार काही स्पर्धा नियोजित नाहीत. त्यामुळे हार्दिकची कसोटी सामन्यात वर्णी लागली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये बदल करण्यात आले आहेत. सर्व सामने वनडे आणि टी-20 प्रकारात खेळवण्यात येत आहे. घरच्या मैदानावर हार्दिक पांड्या फार महत्त्वपूर्ण नसला तरी परदेशात तो संघासाठी फायदेशीर ठरु शकतो. 

तेव्हा मला राहुलभाईने कॉल केला आणि... 'अजिंक्य' यशात 'मिस्टर रिलायबल'चा हात

टीम इंडियाकडे अश्विन, जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्यारुपात अष्टपैलू खेळाडूंचे पर्याय उपलब्ध असले तरी परदेशात पांड्याची गरज भासू शकते, असे मत दासगुप्ता यांनी व्यक्त केले. परदेशी खेळपट्टीवर खेळताना पांड्याचे महत्त्व दहापटीने वाढते, असेही ते म्हणाले. 

भारतीय संघ जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात 5 कसोटी सामने खेळणार आहे. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ पोहचण्याची दाट शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याला संधी देऊन संघाचा ताळमेळ घालण्यावर भर दिला जात आहे, असे दासगुप्ता यांनी म्हटले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या