INDvsENG : डावखुऱ्यांविरोधात ठरला उजवा; अश्विनचा 'द्विशतकी' विश्वविक्रम

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 14 February 2021

ब्रॉडला अश्विनने खातेही उघडू दिले नाही. त्याच्या विकेटसह अश्विनने पहिल्या डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.

भारत आणि इंग्लंड यांच्या विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनुभवी अश्विनने इंग्लंच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले. अश्विनने पहिल्या डावात 5 फलंदाजांना तंबूत धाडले. यादरम्यान त्याने एक खास विक्रम आपल्या नावे केलाय. कसोटीत 200 डावखुऱ्या फलंदाजांना बाद करणारा तो पहिला गोलंदाज ठरलाय. यात त्याने ऑस्ट्रेलियन सलामीवीर आणि स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या डेविड वॉर्नरला सर्वाधिक वेळा बाद केले आहे. तब्बल दहा वेळा वॉर्नर अश्विनच्या जाळ्यात अडकलाय.

इंग्लंडचा माजी कर्णधार एलस्टर कूक या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. कूकला त्याने नऊ वेळा तंबूचा रस्ता दाखवलाय. बेन स्टोक्स सातव्यांदा त्याच्या जाळ्यात अडकला. आघाडी कोलमडल्यानंतर बेन स्टोक्स संघाला सावरेल असे वाटत असताना अश्विनने त्याची विकेट घेतली. बेन स्टोक्सने 34 चेंडूत 18 धावांची खेळी केली. अश्विनने त्याचा त्रिफळा उडवला. अश्विनने अनोखा विक्रम आपल्या नावे केला असताना इंग्लिश ताफ्यातील जलदगती गोलंदाज ब्रॉडच्या नावे नकोसा विक्रम नोंद झाला. 

INDvsENG : वाजवा रे, शिट्या, टाळ्या वाजवा; विराटचा मैदानावरूनच प्रेक्षकांशी संवाद! (VIDEO)

ब्रॉडला अश्विनने खातेही उघडू दिले नाही. त्याच्या विकेटसह अश्विनने पहिल्या डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. अश्विनने 29 वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रमही आपल्या नावे केला. खातेही उघडू न शकलेल्या ब्रॉडने आपला सहकारी अँड्रसनची बरोबरी केली. 36 वेळा तो शून्यावर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या मेग्राचा नंबर लागतो. मेग्रा 35 वेळा शून्यावर बाद झाला आहे. सर्वाधिवेळा शून्यावर बाद होणाऱ्या जलदगती गोलंदाजांमध्ये कर्टनी वॉल्श आघाडीवर आहेत. ते 43 वेळा खाते उघडण्यात अपयश आले. बॉड आणि अँड्रसन दोघेही आता या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.  

Ind vs En 2nd Test : अश्विनचा पंजा; 134 धावांतच इंग्लंडचा खेळ खल्लास!

अश्विनच्या फिरकीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात मजबूत पकड मिळवली आहे. पाहुण्या इंग्लंडच्या संघाला 134 धावांत आटोपून टीम इंडियाने 198 धावांच्या आघाडीसह दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यास सुरुवात केलीय. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला पुन्हा अश्विन चांगलाच नाचवू शकतो. 


​ ​

संबंधित बातम्या