INDvsENG : डायरेक्टर हिट असता तर जॉनीही तंबूत परतला असता (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 4 March 2021

बेन स्टोक्स या जोडीनं संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

चार सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर असलेल्या पाहुण्या इंग्लंड संघाने अहमदाबादच्या मैदानात पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली. अपेक्षप्रमाणे चौथ्या डावात बॅटिंग करण्याची नामुष्की ओढवणार नाही याची काळजी घेत कर्णधाराने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा फ्लॉपशो दाखवला. कर्णधार ज्यो रुटसह सलामीवीर दुहेरी आकडाही पार करु शकले नाहीत. 

उपहारापर्यंत इंग्लंडने 3 बाद 74 धावा केल्या होत्या. आघाडीचे गडी माघारी परतल्यानंतर जॉनी बेयरस्ट्रो आणि बेन स्टोक्स या जोडीनं संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. उपहारापर्यंत दोघांनी 44 धावांची भागीदारी केली. जॉनी बेयरस्ट्रो मागील दोन्ही डावात शून्यावर बाद झाला होता. त्याने आपल्या चुका सावरत फूटवर्कवर भर देऊन बॅटिंग केली. 64 चेंडूत त्याने 6 चौकाराच्या मदतीने 28 धावा केल्या तर दुसऱ्या बाजूला 40 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकारच्या मदतीने 24 धावांची भर घातली होती. ही जोडी फोडण्याची एक संधी टीम इंडियाला मिळाली होती. पण थोडक्यात ही संधी हुकली. 

INDvsENG : स्टोक्स सिराजला नडला; मग विराट त्याला भिडला! (VIDEO)

बेन स्टोक्स - जॉनी बेयरस्ट्रो गडबडले

इंग्लंडच्या डावातील 22.2 व्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. यावेळी सेट झालेल्या जोडीतील ताळमेळ ढासळल्याचे पाहायला मिळाले. जॉनी बेयरस्ट्रोनं फ्लॅटर डिलिव्हरीचा चेंडू स्केअर लेगच्या दिशेनं खेळला. धाव घेण्यासाठी जॉनी क्रिजच्या मध्यापर्यंत आला. पण स्टोक्सने त्याला माघारी धाडले. पंतच्या हातात चेंडू पडल्यानंतर जॉनी सुरक्षित क्रिजमध्ये पोहचला होता. थर्ड अंपायरने त्याला नाबाद ठरवले. जर डायरेक्ट थ्रो असता तर उपहारापूर्वी इंग्लंडचा संघ आणखी अडचणीत आला असता.  जॉनीने चांगली सुरुवात केली. मात्र उपहारानंतर सिराजने त्याला 28 धावांवर माघारी धाडले.   

 


​ ​

संबंधित बातम्या