INDvsENG : बेन स्टोक्सचा चेन्नईत क्लोज कॅचिंग प्रॅक्टिसवर भर (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 31 January 2021

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन बेन स्टोक्सच्या सरावाचा एक व्हिडिओ शेअर केलाय.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघातील खेळाडू सज्ज झाले आहेत. चेन्नईमध्ये सर्वात अगोदर पोहचलेल्या बेन स्टोक्सने क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करुन सरावालाही सुरुवात केलीय. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन बेन स्टोक्सच्या सरावाचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तो क्लोज कॅचिंगच प्रॅक्टिस करताना दिसतोय. त्याच्यासोबत रॉरी बर्नस हा देखील व्हिडिओमध्ये दिसतोय. चेन्नईच्या मैदानात ही जोडगोळी कसून सराव करत आहे, असा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आला आहे. 

जो रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने श्रीलंकेतील मैदान मारले आहे. आशियाई मैदानात जो बन्सने सर्वाधिक धावांचा पराक्रमही श्रीलंका दौऱ्यावर केला असून अशीच खेळी भारताविरुद्धच्या सामन्यात करण्यासाठी तो उत्सुक असेल. बेन स्टोक्स हा इंग्लंडच्या ताफ्यात अष्टपैलूची भूमिका कशी पार पाडणार हे देखील पाहण्याजोगे असेल. गेल्या काही सामन्यात बेन स्टोक्सने इंग्लंडसाठी दमदार खेळ करुन अनेक सामने जिंकून दिले आहेत. यात विश्वचषकाचाही समावेश आहे. बेन स्टोक्स हा प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू असला तरी आयपीएलमुळे त्याचे भारतातही चाहते पाहायला मिळतात. त्यामुळे तोही दमदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. 

Vijay Hazare Trophy : मुंबईच्या संभाव्य संघात अर्जुन तेंडुलकरची वर्णी

श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेत इंग्लंडने यजमानांना सहज पराभूत केला होता. दुसरीकडे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या मैदानात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. विराटच्या अनुपस्थितीत टिम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हतबले ठरवले आहे. किंग कोहली इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करत असल्यामुळे भारतीय संघाटी ताकत निश्चितच वाढली आहे. हार्दिक पांड्याही कमबॅक करणार असून ईशांत शर्माच्या रुपात गोलंदाजीची ताकदही वाढल्याचे पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ एकमेकांविरद्ध कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या