"पंतच्या खेळीने प्रतिस्पर्ध्यांवर दडपण"

सुनंदन लेले
Monday, 8 February 2021

आम्ही सहज धावा करीत होतो. पंतने चांगला हल्ला करीत होता. नेमके याच वेळी मी बाद झाल्याने निराश आहे, असेही तो म्हणाला.

रिषभ पंत नैसर्गिक आक्रमक फलंदाज आहे. संघ व्यवस्थापनही त्याला त्याच्या शैलीत खेळायला प्रोत्साहन देते. रिषभने गोलंदाजांवर आक्रमण सुरू केल्यावर प्रतिस्पर्धी संघावर दडपण येते आणि मला खेळणे सोपे जाते, असे चेतेश्वर पुजाराने सांगितले. रिषभसोबत चांगल्या भागीदाऱ्या मी केल्या आहेत. तो असतानाही मी माझ्या शैलीतच फलंदाजी करणे पसंत करतो. रिषभने काही फटके मारून विकेट गमावणे टाळण्याची नक्कीच गरज आहे. तो नक्कीच शिकेल, असेही पुजाराने सांगितले.

अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर चांगली फलंदाजी करत आहेत. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ महत्त्वाचा आहे. चेपॉकची खेळपट्टी फिरकीला साथ देत आहे; पण अजून ती फलंदाजीला उत्तम आहे, असेही पुजाराने सांगितले. जम बसला असताना बाद होणे, हे दुर्दैवच आहे.  माझी आणि रिषभची भागीदारी रंगली होती.

"कोणतेही खास प्लॅनिंग न करता कोहली जाळ्यात अडकला"

आम्ही सहज धावा करीत होतो. पंतने चांगला हल्ला करीत होता. नेमके याच वेळी मी बाद झाल्याने निराश आहे, असेही तो म्हणाला. पुजाराने, ‘आम्ही अजूनही चांगल्या स्थितीत आहोत. तिसऱ्या दिवशी आमचा पहिला डाव किती लांबतो, यावर सर्व अवलंबून आहे,’ असेही तो म्हणाला. 
 


​ ​

संबंधित बातम्या