INDvsENG : पंत-पुजाराच्या शतकी भागीदारीनं थोडासा दिलासा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 7 February 2021

इंग्लंडच्या डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. शुभमन गिलने सुरुवात चांगली केली पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.

INDvsENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी फ्लॉप शो दाखवला. रोहित शर्मा (6) आणि शुभमन गिल (29) या सलामीवीरांना जोफ्रा आर्चरने तंबूत धाडले. पहिल्या धक्क्यातून संघाला सावरण्यात कर्णधार-उपकर्णधारही अपयशी ठरले. बेसनं या दोघांना जाळ्यात ओढले. विराट कोहली 48 चेंडू खेळून अवघ्या 11 धावा करुन माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या उप कर्णधार अजिंक्य रहाणेला अवघ्या 1 धावेवर माघारी धाडले. 

आघाडी कोलमडल्यानंतर पुजारा-पंत जोडीनं संघाचा डाव सावरला. 4 बाद 73 अशी बिकट अवस्था असताना दोघांनी शतकी भागीदारी करुन डावाला आकार दिला आहे. ब्रिस्बेन कसोटीचा हिरो रिषभ पंतसह चेतेश्वर पुजारानेही अर्धशतक साजरे केले असून संकटात अडकलेल्या टीम इंडियाची जबाबादीर दोघांनी खांद्यावर घेतली आहे. 

FAB 4 मधील वातावर टाइट; ज्यो देतोय केन-स्मिथ-कोहली तिकडीला फाईट

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने 578 धावा करुन टीम इंडियासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. फलंदाजानंतर गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. सध्याच्या घडीला कसोटीमध्ये इंग्लंडचा संघ फ्रंटफूटवर आहे. ज्यो रुटच्या शतकानंतर अपराजित राहण्याची परिस्थितीत इंग्लंड पुन्हा एकदा दिसते. दुसऱ्या बाजूला भारतीय संघाला सामना अनिर्णित राखण्यासाठी जोर लावावा लागणार आहे.  

इंग्लंडच्या डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. शुभमन गिलने सुरुवात चांगली केली पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे आघाडीच्या चार जणांची जबाबदारी पंत-पुजाराच्या खांद्यावर पडली आहे. शतकी भागीदारी करुन त्यांनी ती पेलण्यास सक्षम असल्याचे दाखवूनही दिले.


​ ​

संबंधित बातम्या