INDvsENG : अश्विनच्या 400 विकेट्स, मैलाचा टप्पा गाठण्यासाठी घेतला खूपच कमी वेळ

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 25 February 2021

भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट मिळवणारा अश्विन हा चौथा गोलंदाज आहे. अनिल कुंबळे (953), हरभजन (707), कपिल देव (678) विकेट घेतल्या आहेत.  

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर सुरु असलेल्या आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या मैदानात अश्विनने मैलाचा पल्ला पार केला. जोफ्रा आर्चरला बाद करत अश्विनने कसोटीतील 400 विकेट्सचा टप्पा पार केला. अहमदाबादचे मैदान भारतीय क्रिकेटसाठी विक्रमाची साक्ष देणारे ठिकाण आहे. लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी याच मैदानात 10 हजार धावांचा टप्पा पार केला होता. भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देव यांनी सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम याच मैदानात केला होता. त्यानंतर आता अश्विनने चारशे विकेट्सचा पल्ला गाठला आहे. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट मिळवणारा अश्विन हा चौथा गोलंदाज आहे. अनिल कुंबळे (953), हरभजन (707), कपिल देव (678) विकेट घेतल्या आहेत.  

INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!​

जगातील दिग्गज फिरकीपटू म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या मुथय्या मुरलीधरन यांनी 72 व्या कसोटी सामन्यात 400 बळी मिळवले होते. रविचंद्रन अश्विनने 77 व्या सामन्यात हा पल्ला गाठला.  सर्वात जलद 400 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. रिचर्ड हेडली आणि डेल स्टेन यांनी 80 कसोटी सामन्यात 400 विकेट घेतल्या आहेत. रंगना हेरथने 84 सामन्यात 400 विकेटचा टप्पा पूर्ण केला होता. 

INDvsENG 'वेड्या'चे घर उन्हात; नरेंद्र मोदी स्टेडियमची 'अंदर की बात'

भारताचे दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी  2004 मध्ये 85 व्या कसोटी सामन्यात 400 विकेट घेण्याचा पल्ला गाठला होता. ग्लेन मेग्रा (87), शेन वॉर्न (92), वसीम आक्रम आणि हरभजन सिंग यांनी (96) सामन्यानंतर हा टप्पा पार केला होता. अश्विनने अवघ्या 10 वर्षांत मैलाचा टप्पा पार केलाय. काही दिवसांपूर्वीच खुद्द मुथय्या मुरलीधरन यांनी अश्विन माझा विश्वविक्रम मोडण्याची ताकद असल्याचे म्हटले होते. कसोटीमध्ये 800 विकेट घेण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरन यांच्या नावे आहे. 


​ ​

संबंधित बातम्या