INDvsENG : शतकी पंचसह घरच्या मैदानावर अश्विची 'बल्लेबल्ले'

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 15 February 2021

आपल्या घरच्या मैदानावर अश्विननं कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावलं

INDvsENG 2nd Test : पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या रविचंद्रन अश्विनने घरच्या मैदानावर कसोटी कारकिर्दीतील पाचव्या शतकाला गवसणी घातली. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर अश्विनने कर्णधार विराट कोहलीला उत्तम साथ दिली. या दोघांनी शतकी भागीदारी पूर्ण केली. विराट कोहली 62 धावांवर बाद होऊन परतल्यानंतर अश्विनने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. 134 चेंडूत त्याने शतक पूर्ण केले.गोलंदाजीतील कमालीच्या कामगिरीनंतर फलंदाजीतही त्याने हातसाफ केले.  


​ ​

संबंधित बातम्या