INDvsENG : भुवीनं बटलरला त्रस्त करुन केल फस्त; हाच तर मॅचचा टर्निंग पाँइंट

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 20 March 2021

विराट कोहलीने पुन्हा एकदा भुवीच्या हाती चेंडू सोपवला आणि भारताला आवश्यक असलेला ब्रेक थ्रू त्याने मिळवूनही दिला. 

इंग्लंड विरुद्धच्या निर्णायक सामन्यात प्रथण फलंदाजी करताना टीम इंडियाने इंग्लंडसमोर 225 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जेसन रॉयला भुवीन दुसऱ्या चेंडूवर माघारी धाडले. त्यानंतर बटलर आणि डेविड मलान यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले. दोघांनी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोघांनी 130 धावांची भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियाला ट्रॉफी उचलण्यात अडथळा ठरत असताना कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा भुवीच्या हाती चेंडू सोपवला आणि भारताला आवश्यक असलेला ब्रेक थ्रू त्याने मिळवूनही दिला. 

पहिल्या दोन षटकात अवघ्या 6 धावा खर्च करुन एक विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारने तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू व्हाईट टाकला. त्यानंतर त्याने केवळ एक धावा दिली. पुन्हा एक निर्धाव चेंडू आणि पुन्हा एक धाव देत त्याने बटलरला मोठा फटका खेळण्यास प्रवृत्त केले. पाचव्या चेंडूवर बटलर फसला आणि हार्दिक पांड्याच्या हाती झेल देऊन परतला. बटलरने 34 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. या मालिकेत दोनवेळा तो अर्धशतकाच्या जवळ येऊन बाद झाला होता. यावेळी त्याने अर्धशतक पूर्ण केले. मात्र मोक्याच्या क्षणी त्याने विकेट गमावली. ही विकेट भारतीय संघाला सामन्यात आणणारी होती.  

INDvsENG : बदलाच्या प्रयोगात विराट-रोहित जोडी ठरली हिट

भारती संघाने या मालिकेत सुरुवातीच्या काळात निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्नचिन्ह उपस्थिती झाले. भारतीय संघाने अतिरिक्त गोलंदाजासह उतरण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी वर्तवले. ट्रॉफी उंचावण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर भारतीय संघात हा मोठा बदल दिसला.  टी नटराजनच्या स्वरुपात टीम इंडियाने लोकेश राहुलला बाकावर बसवत अतिरक्त गोलंदाज खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना 200 + केलेली धावसंख्या आणि गोलंदाजीमधील बदल भारतीय संघासाठी फायदेशीर ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.


​ ​

संबंधित बातम्या