INDvsENG : सूर्यासाठी रोहित बाहेर बसला; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 12 March 2021

सोशल मीडियावर मात्र यासंदर्भात वेगळीच चर्चा रंगली आहे. एका नेटकऱ्याने रोहित शर्मा सूर्यकुमार यादवसाठी बाहेर बसल्याचे ट्विट केले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात कोणाच्याही ध्यानी मनी नसलेला बदल पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकल्यानंतर विराट कोहलीने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. यात रोहित शर्माच्या नावाचा समावेश नव्हता. या सामन्यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही संधी मिळणार का? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. मात्र पहिल्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली नाही. विराट कोहलीने नाणेफेकीवेळी विराट कोहलीला काही सामन्यात विश्रांती देण्यात येणार असल्याचे सांगितले. 

सोशल मीडियावर मात्र यासंदर्भात वेगळीच चर्चा रंगली आहे. एका नेटकऱ्याने रोहित शर्मा सूर्यकुमार यादवसाठी बाहेर बसल्याचे ट्विट केले आहे. पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या आपल्या सहकाऱ्यासाठी रोहितनं मोठा निर्णय घेतला, असा अंदाजही या नेटकऱ्याने वर्तवला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे सूर्यकुमार यादव सध्या ट्रेंडिगमधअये आलाय. सामन्यापूर्वी भारतीय जर्सीतील त्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता रोहित शर्मासोबतचे त्याचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्सच्या एका फॅन क्लब पेजवरुन रोहित शर्मा. ईशान किशन आणि सूर्यकुमार यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलेले नाही, असे पोस्ट शेअर केली आहे. आयपीएलमधील काही फोटोही या पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत. 

युएईतील आयपीएलमध्ये विराट-सुर्यकुमार यांच्यातील मैदानातील टश्शनची चांगलीच चर्चा रंगली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सूर्याला संधी मिळेल, अशी चर्चा असताना सुर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान मिळाले नाही. यावेळी सूर्याच्या बाजूने सोशल मीडियावर संघात घेण्यासाठी एक मोहिमच चालली होती. अखेर इंग्लंड विरुद्धच्या टी-20 साठी  त्याला संघात घेण्यात आले. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी त्याला प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


​ ​

संबंधित बातम्या