INDvsENG : आपल्याच 3 गड्यांनी वॉशिंग्टनला नाइंटीमध्ये नर्व्हस केलं

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 6 March 2021

थ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात शतक झाले नसले तरी भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणण्यासाठी वॉशिंग्टनची खेली महत्त्वपूर्ण ठरली. 

अहमदाबादच्या मैदानात सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पंत-वॉशिंग्टन सुंदरनं टीम इंडियाचा डाव सावरला. दुसऱ्या दिवशी अर्धशतक पूर्ण करणारा वॉशिंग्टन सुंदर  चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावणार असे वाटत असताना भारतीय संघाने 6 चेंडूत तीन विकेट गमावल्या. अक्षर, ईशांत आणि सिराज बाद झाल्यामुळे सुंदरला 96 धावांवर नाबाद राहिला.  5 सामन्यातील सात डावात वॉशिंग्टनच्या नावे आता 4 अर्धशतके जमा झाली आहेत. आपल्याच सहकाऱ्यांनी साथ 

अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पंतच्या शतकाची चर्चा रंगली. त्याला वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) नेही उत्तम साथ दिली. आठव्या क्रमांकावर उतरुन भारतीय संघाचा डाव सावरला नाही तर दुसऱ्या दिवशी 117 चेंडूचा सामना करुन 60 धावा करणाऱ्या वॉशिंग्टनने पहिल्या शतकाला गवसणी घालण्याच्या दिशेन वाटचाल सुरु केली होती. पण त्याला शतक पूर्ण करता आले नाही.  भारतीय संघाचा पहिला डाव 365 धावांत आटोपला. वॉशिंग्टन सुंदर 174 चेंडूत 96 धावांवर नाबाद राहिला. बेन स्टोक्सने ईशांत शर्मा आणि सिराजला बाद करुन वॉशिंग्टनला शतकापासून दूर ठेवले. 

सध्याच्या घडीला वॉशिंग्टन गोलंदाज म्हणून संघात आहे. त्याची सातत्याने होणारी बॅटिंगमधील कामगिरीमुळे तो वरच्या क्रमांकावर खेळू शकतो, असा विश्वास निर्माण करणारी आहे. वॉशिंग्टन सुंदर हार्दिक पांड्या आणि हनुमा विहारी  यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण करताना दिसतोय. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात शतक झाले नसले तरी भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणण्यासाठी वॉशिंग्टनची खेली महत्त्वपूर्ण ठरली. 


​ ​

संबंधित बातम्या