INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 24 February 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात सुरुवातीपासून फिरकीला मदत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात लोकल बॉय अक्षर पटेलने आपल्या फिरकीची कमाल दाखवली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या अक्षर पटेलनं  सहा गड्यांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. अर्धशतकी खेळी करणाऱ्या झॅक क्राउलीसह (53) बेयरस्ट्रो (0), स्टोक्स (6), फोक्स (12), जोफ्रा आर्चर (11) आणि ब्रॉडला (3) त्याने आपले शिकार केले. चेन्नईच्या मैदानात पदार्पणात पाच विकेट घेणाऱ्या अक्षरने घरच्या मैदानावर सहा विकेट घेऊन अनोखा षटकार खेचला. सलग दुसऱ्या सामन्यात त्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. 

PM मोदी स्टेडियम अन् अदानी-अंबांनी एन्ड; सोशल मीडियावर रंगला अनोखा 'सामना'

चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीत लोकल बॉय अश्विनने मैदान गाजवल्याचे पाहायला मिळाल्यानंतर अहमदाबादच्या घरच्या मैदानावर अक्षर पटेलनं आपली विशेष छाप सोडली. त्याला अश्विनने सुरेख साथ दिली. परिणामी इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 112 धावांत आटोपला. जगातील सर्वात मोठ्या मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. सामन्यापूर्वी याची कल्पना कोणीच केली नव्हती. सोशल मीडियावर यामुद्यावरुन संमिश्र प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर लोकल बॉय झळकल्याने अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वोकल फॉल लोकलचा नाराही आठवला असेल.

फिरकीपटूंनी इंग्लिश फलंदाजांना नाचवले; पीटरसनची नेटकऱ्यांनी जिरवली

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात सुरुवातीपासून फिरकीला मदत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. इंग्लिश ताफ्यालाही याची कल्पना होती. मात्र त्यांनी यासाठी विशेष काही तयारीच केली नसल्याचे समोर आले. कोणता चेंडू वळतोय आणि कोणता थेट येतोय याचा अंदाज घेण्यात इंग्लिश फलंदाजांची चांगलीच तारंबळ उडाली. त्यामुळे नाणेफेक जिंकून ते बॅकफूटवर गेले आहेत. पहिल्या दिवशी इंग्लंडला 50 षटकेही खेळता आली नाहीत. भारतीय संघ आता पहिल्या डावात किती धावा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या