नाणेफेक गमावणेच पराभवास निमंत्रण : अश्‍विन

सुनंदन लेले
Tuesday, 9 February 2021

भारतीय फलंदाज पाचव्या दिवशी 90 षटके खेळून हा सामना नक्की वाचवू शकतात असा मला विश्वास आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिले दोन दिवस भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरल्याची टीका झाली होती. त्यास रविचंद्रन अश्‍विन आणि ईशांत शर्माने चौथ्या दिवसाच्या खेळानंतर प्रत्युत्तर दिले. त्यांनी या कसोटीत नाणेफेकीचा निर्णयच मोलाचा ठरले असल्याचे सांगितले. एकंदरीत कसोटीचे चित्र पाहता नाणेफेक गमावणेच पराभवास निमंत्रण देण्यासारखे होत आहे. 

चेन्नईतील कसोटीच्यावेळी खेळपट्टी पहिले दोन दिवस फलंदाजीस पोषक असते याची कल्पना होती, पण ती ठणठणीत असेल असे वाटले नव्हते, त्यामुळे नाणेफेक जिंकल्याचा खूप मोठा फरक पडतो. इंग्लंडने याचा फायदा घेतला, अशी टिप्पणी अश्‍विनने चौथ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत केली. त्याचवेळी इशांत शर्माने पहिले दोन दिवस रस्त्तावर गोलंदाजी करीत आहोत, असे वाटत होते, अशी बोचरी टिका केली. त्याने याचबरोबर चौथ्या दिवशी चेंडूने फिरक घेण्यास सुरुवात केली होती आणि आम्ही झटपट ब्रेक देण्यास सुरुवात केली, असेही तो म्हणाला. 

IND vs ENG: त्रिशतकासह ईशांत कपिल पाजी आणि झहीरच्या पंक्तीत

अश्‍विनची निराशा स्वाभाविक होती. भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकला आहे, त्यानंतरच्या चारही कसोटीत हा कौल विरोधात गेला आहे. ऑस्ट्रेलियात खेळपट्टीचे रंग फारसे बदलत नाहीत, पण भारतात हा खूपच फरक पडतो. 

अश्‍विनने खेळपट्टीप्रमाणेच अपयशासाठी चेंडूलाही जबाबदार धरले. तो म्हणाला, यावेळी गुगलीवर मर्यादा आली होती. कारण चेंडूची शिवण मऊ झाली होती, तर काही ठिकाणी तुटलीही होती. खेळपट्टी खूप टणक असल्याने हे घडले असण्याची शक्‍यता असू शकते, पण एकंदरीत चेंडूवरील शिवण यावेळी योग्य वाटली नाही, असेही अश्‍विन म्हणाला. भारताच्या आघाडीच्या फिरकी गोलंदाजाने पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांसमोरील आव्हान अवघड असेल असेच संकेत दिले. तो म्हणाला. आता चेंडू अचानक खाली रहात आहे.  

Australian Open 2021 : सेरेनाचा हटके अंदाज; चर्चा तर होणारच (VIDEO)

वॉशिंग्टन सुंदरची सुरेख फलंदाजी, आम्हाला मोठ्या भागीदारीची संधी होती. पहिल्या डावात खेळपट्टी चांगली असल्याने इंग्लंड फलंदाजांवर दडपण नव्हते. दुसऱ्या डावाच्यावेळी धावांचे भक्कम पाठबळ असल्याने ते दडपणाखाली नव्हते. ईशांत हा सर्वाधिक मेहनत घेणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. तेरा चौदा वर्षे तंदुरुस्ती राखणे सोपे नाही, असेही अश्विनने म्हटले आहे.

  


​ ​

संबंधित बातम्या