इंग्लंच्या घातक गोलंदाजाला टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांची धास्ती

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 3 February 2021

भारतामध्ये आतापर्यंत मी एकही कसोटी सामना खेळलेलो नाही. त्यामुळे  हा दौरा माझ्यासाठी खास असेल. जर आमचा संघ तीन गोलंदाजांसह मैदानात उतरला तर मला अधिक गोलंदाजी करावी लागेल, असेही तो म्हणाला. 

इंग्लंच्या घातक गोलंदाजाला टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांची धास्ती
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने इंग्लंडचा युवा गोलंदाज जोफ्रा आर्चरपासून टीम इंडियाने सावध रहावे, असा इशारा दिलाय. कसोटी सामन्यात आतापर्यंत 11 सामन्यात जोफ्राने घेतलेल्या 38 विकेट घेतल्या आहेत. याचाच दाखला देत गंभीरने टीम इंडियाने जोफ्राला गांभिर्याने घेण्याचा सल्ला दिलाय. मात्र खुद्द जोफ्राने एका मुलाखतीमध्ये आघाडीच्या फलंदाजांची धास्ती असल्याचे बोलून दाखवले आहे.  

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरने ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांची विकेट घेणे मुश्किल असल्याचे म्हटले आहे. आयपीएलच्या माध्यमातून भारतात अनेक सामने खेळले असले तरी कसोटी सामन्यासाठी तो पहिल्यांदा भारतीय मैदनात उतरणार आहे. 

सर्वोत्तम पुरस्कारासाठी रिषभ पंत, रूटला नामांकन

भारतीय संघाची आघाडी मजबूत आहे. पहिल्या सहा फलंदाजांपैकी कोणताही फलंदाज कोणत्याही क्षणी शतकी खेळी करुन सामना वळवू शकतो, असे जोफ्राने म्हटले आहे.  भारतीय संघाच्या आघाडी फलंदाजांमध्ये सलामीवीर रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांचा समावेश आहे.   

भारतामध्ये आतापर्यंत मी एकही कसोटी सामना खेळलेलो नाही. त्यामुळे  हा दौरा माझ्यासाठी खास असेल. जर आमचा संघ तीन गोलंदाजांसह मैदानात उतरला तर मला अधिक गोलंदाजी करावी लागेल, असेही तो म्हणाला. गौतम गंभीर यांनी जोफ्रा आर्चर टीम इंडियासाठी घातक ठरु शकतो असे म्हटले होते. आतापर्यंत जोफ्राने गोलंदाजाला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजी केली आहे. भारतीय मैदानात तो अद्याप कसोटी सामना खेळला नसला तरी त्याच्या गोलंदाजीवर खेळताना गांभिर्य बाळगायला हवे, असे गंभीरने म्हटले होते. 


​ ​

संबंधित बातम्या