INDvENG: धोनीला मागे टाकून सर्वोत्तम कर्णधार होण्याची 'विराट' संधी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 29 January 2021

इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकून विराट कोहलीला नवा विक्रम रचण्याची संधी आहे. संघ त्याच्या विक्रमाला हातभार लावणार की टेन्शन वाढवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ परदेशातून मालिका जिंकून आल्यामुळे 4 सामन्यांच्या मालिका अटितटीचा होईल, असा अंदाज आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून विराट पुन्हा कमबॅक करत आहे. 2020 हे वर्ष विराट कोहलीसाठी शतकाविना गेले. त्यानंतर आता नव्या वर्षात धमाकेदार सुरुवात करण्याच्या इराद्याने तो मैदानात उतरेल.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात दिमाखदार आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. भारतीय संघाच्या या मालिका विजयानंतर अजिंक्य रहाणे कसोटी संघाचे नेतृत्व पेलण्यासाठी सक्षम असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. या चर्चेचे कुठेतरी विराट कोहलीवर दबाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाचा चांगलाच कस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

विराट कोहलीला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात एक खास विक्रमही खुणावत आहे. घरच्या मैदानावर विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी यांनी प्रत्येकी 9-9 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकून विराट कोहलीला नवा विक्रम रचण्याची संधी आहे. संघ त्याच्या विक्रमाला हातभार लावणार की टेन्शन वाढवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

PAK vs RSA: कसोटीतही चोकर्सवाला शो! पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला नमवले

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकूण 21 कसोटी सामने जिंकले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 20 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. 4 सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकून विराटला धोनीला ओव्हरटेक करण्याची संधी आहे. जर हे शक्य झाले तर घरच्या मैदानातील सर्वोत्तम कर्णधाराचा मान कोहलीला मिळेल. घरच्या मैदानावर सर्वोत्तम नेतृत्व कौशल्य सिद्ध करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत मोहम्मद अझरुद्दीन तिसऱ्या स्थानावर आहे. तर भारतीय क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि क्रिकेटमधील दादा चौथ्या क्रमांकावर आहे. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 13 तर गांगुलींच्या नेतृत्वाखाली 10 कसोटी सामने जिंकले आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या